पुलाची तीन महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 11:04 AM2020-01-31T11:04:08+5:302020-01-31T11:06:36+5:30
लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच या पुलाची उंची वाढवून रुंदीकरण करावे, अशीही मागणी यावेळी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. तरीही संबंधित विभागाने याकडे कानाडोळा करून पुन्हा नव्याने या सिमेंट काँक्रिटीकरण केलेल्या पुलावर डांबरीकरणाचा मुलामा देण्याचा घाट घातला आहे.
मायणी : मायणी-म्हसवड मार्गावर कानकात्रे (ता. खटाव) हद्दीतील जुन्या दगडी पुलावर तीन महिन्यांपूर्वीच सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या तीनच महिन्यांत या काँक्रिटीकरणावर पुन्हा डांबरीकरण करण्याचे काम सुरू केले.
याबाबत माहिती अशी की, खटाव-माण तालुक्याला जोडणाºया मायणी-म्हसवड मार्गावरील कानकात्रे गावच्या हद्दीत ब्रिटिशकालीन तलावापासून आलेल्या ओढ्यावर दगडी पूल आहे. पुलांची अवस्था अतिशय खराब झाली होती. याबाबत ह्यलोकमतह्णमधून वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर आॅक्टोबर महिन्यामध्ये या दगडी पुलावर सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले होते.
सिमेंट काँक्रिटीकरण अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे तीन महिन्यांच्या आतच या काँक्रिटीकरण कामातील खडी वरती येऊन परिसरामध्ये धुळीचे साम्राज्य पसरू लागले होते. सिमेंट काँक्रीट करण्याच्या कामाचा दर्जाही उत्तम नसल्यामुळे या पुलाच्या दोन्ही बाजूस असलेल्या उतारामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना अडचण येत होती. तसेच पुलाचे संरक्षण दगडही या काँक्रिटीकरणामुळे दिसेनासे झाले होते. त्यावर पुन्हा डांबरीकरणाचा थर होत असल्याने हा पूल अधिकच धोकादायक होत आहे.
लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच या पुलाची उंची वाढवून रुंदीकरण करावे, अशीही मागणी यावेळी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. तरीही संबंधित विभागाने याकडे कानाडोळा करून पुन्हा नव्याने या सिमेंट काँक्रिटीकरण केलेल्या पुलावर डांबरीकरणाचा मुलामा देण्याचा घाट घातला आहे.
पुलाची उंची वाढवून रुंदीकरण करावे व त्याखाली कोल्हापूर टाईप बंधारा करावा, अशी मागणी आम्ही सतत करत असूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तीन महिन्यांपूर्वीच केलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणावर पुन्हा डांबरीकरण सुरू केले आहे.
- अनिल सावंत, सामाजिक कार्यकर्ते , कानकात्रे, ता. खटाव