रॅपिअरची पेमेंटधारा पूर्ववत ३० दिवसांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:29 AM2021-09-05T04:29:35+5:302021-09-05T04:29:35+5:30
इचलकरंजी : रॅपिअर कारखानदारांची बेसिक क्वॉलिटीची किमान मजुरी १५.५० पैसे प्रति पीक देण्याचा निर्णय घेतला होता. याची १ सप्टेंबरपासून ...
इचलकरंजी : रॅपिअर कारखानदारांची बेसिक क्वॉलिटीची किमान मजुरी १५.५० पैसे प्रति पीक देण्याचा निर्णय घेतला होता. याची १ सप्टेंबरपासून अंलबजावणी सुरू झाली आहे. तसेच पेमेंटधारा पूर्ववत ३० दिवसांची करण्याचा निर्णय इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला.
कोरोनाच्या संकटामुळे निश्चित केलेल्या मजुरी व पेमेंटधारामध्ये विस्कळीतपणा आला होता. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मिटिंगमध्ये १ सप्टेंबर पासून रॅपिअर कारखानदारांची बेसिक क्वॉलिटीची किमान मजुरी १५.५० पैसे प्रति पीक करण्याचा निर्णय घेतला होता. शनिवारी पॉवरलूम असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत कारखानदारांनी पेमेंटधार पूर्ववत ३० दिवसांची करण्यासंदर्भात मते मांडली. त्यानुसार पेमेंटधारा पूर्ववत ३० दिवसांची करण्याचे असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी जाहीर केले. यावेळी पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीस संचालक चंद्रकांत पाटील, कारखानदार अश्विन कोकळकी, अक्षय डाके, सचिन मिरगे, प्रवीण हावळ, गौतम अग्रवाल, महंतेश करडे, अभिजित रवंदे, मोहित खान यांच्यासह रॅपिअर कारखानदार उपस्थित होते.