अवजड वाहनांना रिफ्लेक्टर नियम रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:18 AM2021-06-28T04:18:26+5:302021-06-28T04:18:26+5:30
परिवहन खात्याने अवजड वाहनांना नवीन रिफ्लेक्टर जोडण्यासाठी सक्ती केली आहे. वाहनांच्या पात्रतेबाबत निरीक्षण प्रक्रिया त्या जोडणीशिवाय करता येणार नाही, ...
परिवहन खात्याने अवजड वाहनांना नवीन रिफ्लेक्टर जोडण्यासाठी सक्ती केली आहे. वाहनांच्या पात्रतेबाबत निरीक्षण प्रक्रिया त्या जोडणीशिवाय करता येणार नाही, हे जाचक आहे. दोन वर्षांपूर्वी आलेला महापूर व महापुरानंतरच्या सव्वा वर्षातील कोरोना महामारीचा आपत्काळ या नैसर्गिक आपत्तींमुळे या सर्वच काळात मोटरमालक विविध समस्यांना तोंड देत आहेत. रस्ता वापराचा कर, वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थांचे कर्जाचे हप्ते, वाहनांची देखभाल व दुरुस्ती या व अशा अनेक कारणांसाठी करावा लागणारा खर्च भागविताना वाहनमालक मेटाकुटीस आले आहेत. त्यातच परिवहन खात्याने हा नवीन रिफ्लेक्टर जोडणीचा सक्तीचा नियम केल्यानंतर अशा रिफ्लेक्टर जोडणीसाठी खासगी संस्थांचा आधार घ्यावा लागत आहे. हजारो रुपये या रिफ्लेक्टर जोडणीसाठी खर्च करावे लागतात. आपत्काळात झालेले व्यवयसायातील नुकसान लक्षात घेता सध्याचा हा नवीन नियम पालन करण्यासाठी मोटरमालकांकडे पैसाच उपलब्ध नसल्याने मोटरमालकांत कमालीचा असंतोष पसरला असल्याचे पाटील यांनी सांगितले.