(पुन्हा द्यावी)गडहिंग्लमध्ये चुरशीने .................... टक्के शांततेत मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:28 AM2021-01-16T04:28:59+5:302021-01-16T04:28:59+5:30
下गडहिंग्लमध्ये载 चुरशीने,शांततेत मतदान कमालीची चुरस : 下९७१载 उमेदवारांचे भविष्य 下यंत्रात载 下बंद载 下गडहिंग्लज载 : गडहिंग्लज तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींसाठी मोठ्या चुरशीने ...
下गडहिंग्लमध्ये载 चुरशीने,शांततेत मतदान
कमालीची चुरस : 下९७१载 उमेदवारांचे भविष्य 下यंत्रात载 下बंद载
下गडहिंग्लज载 :
गडहिंग्लज तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींसाठी मोठ्या चुरशीने सरासरी ** मतदान शांततेत पार पडले. एकूण ३५४ जागांसाठी रिंगणातील ९७१ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. एकूण ८१४५० मतदारांपैकी *** मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
तालुक्यातील ८९ पैकी ५० ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. त्यापैकी ६ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित ४४ ग्रामपंचायतींच्या १४१ प्रभागासाठी मतदान घेण्यात आले. त्यासाठी एकूण ९०५ कर्मचारी नेमण्यात आले होते.
बहुतेक गावात स्थानिक सोयीच्या आघाड्या झाल्यामुळे कांही ठिकाणी दुरंगी तर अनेक ठिकाणी बहुरंगी लढती झाल्या. हलकर्णी, तेरणी, नूल, हेब्बाळ, हसूरचंपू, माद्याळ, औरनाळ, लिंगनूर, हिरलगे, ऐनापूर, इंचनाळ, उंबरवाडी, वाघराळी, हेब्बाळ जलद्याळ, शेंद्री, जरळी, दुंडगे येथे मोठी चुरस दिसून आली.
कोरोनामुळे मतदार मास्क बांधूनच केंद्रावर येत होते. ताप व आॅक्सिजन पातळी तपासूनच त्यांना केंद्रात सोडण्यात येत होते. नवमतदारांसह, महिला व वयोवृद्धांनीही मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. वयोवृद्ध, आजारी आणि दिव्यांग मतदारांना केंद्रावर आणण्यासाठी दुचाकी, रिक्षा व चारचाकीचा वापर करण्यात आला.
प्रांताधिकारी तथा निवडणूक निरीक्षक विजया पांगारकर, तहसिलदार तथा नियंत्रक दिनेश पारगे, निवडणूक तहसिलदार विष्णू बुटे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान सुरळीत पार पडले. पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त होता.
---------------------------------
* 'व्होटर अॅप'मुळे गाव आणि प्रभागनिहाय मतदारांचे नाव चटकन शोधून काढणे सोपे झाले. त्यामुळे बुथवरील कार्यकर्ते व उमेदवारांच्या समर्थकांनी मतदार यादीऐवजी अॅपचाच वापर अधिक केला.
---------------------------------
* मतदानाची आकडेवारी कंसात टक्केवारी
- सकाळी - ९.३० वा. (१०.९४), ११.३० वा. (२८.४७), १.३० वा. (५०.४२), ३.३० वा. (६८.०६), ५.३० वा. (***)
---------------------------------
* नरेवाडी व हेब्बाळ जलद्याळ या ठिकाणी बिघाडामुळे मतदान यंत्रे बदलून देण्यात आली.
---------------------------------
* मतमोजणी ठिकाण - पॅव्हेलियन हॉल, गांधीनगर गडहिंग्लज.