पुन्हा वळवाची हजेरी

By Admin | Published: March 29, 2015 12:17 AM2015-03-29T00:17:29+5:302015-03-29T00:17:29+5:30

पाऊस झाल्याने शहरवासीयांना काहीसा गारवा

Repetitive attendance again | पुन्हा वळवाची हजेरी

पुन्हा वळवाची हजेरी

googlenewsNext

कोल्हापूर : दिवसभर उन्हाने भाजून काढल्यानंतर सायंकाळी वळवाचा पाऊस झाल्याने शहरवासीयांना काहीसा गारवा मिळाला. मेच्या अखेरीस जसे वातावरण असते, तसे वातावरण यंदा मार्चमध्येच अनुभवास येत आहे. सायंकाळी पाऊस झाल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र पुन्हा उकाडा हैराण करीत आहे.
यंदा मार्चच्या मध्यापासूनच उन्हाच्या असह्य झळा जाणवत आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता असते. दुपारनंतर रस्त्यांवरील गर्दी कमी होत आहे. विदर्भातील उन्हाळ्यासारखा भाजून काढणारा उन्हाळा कोल्हापुरातही जाणवत आहे. शनिवारी दिवसभराचे वातावरणही तसेच राहिले. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वळीव पावसाने हजेरी लावली; परंतु त्यात जोर नव्हता. रिपरिप सुरू राहिल्याने लोकांची, रस्त्यांवरील विक्रेत्यांची काही प्रमाणात तारांबळ उडाली. अर्धा-पाऊण तास हा पाऊस सुरू राहिला. त्यामुळे लोकांना जणू मृगाची चाहूल लागली. (प्रतिनिधी)

Web Title: Repetitive attendance again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.