पूरग्रस्त भागातील विद्युत मीटर मोफत बदलून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:25 AM2021-07-29T04:25:03+5:302021-07-29T04:25:03+5:30
महापुराच्या पार्श्वभूमीवर आमदार आवाडे यांनी महावितरण कंपनीचे पुणे प्रादेशिक विभागाचे अंकुश नाळे व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा नियोजन ...
महापुराच्या पार्श्वभूमीवर आमदार आवाडे यांनी महावितरण कंपनीचे पुणे प्रादेशिक विभागाचे अंकुश नाळे व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा नियोजन समितीमध्ये हा विषय प्रस्तावित करण्याचे आश्वासन नाळे यांनी दिले. महापुरामुळे शेळके मळ्यातील आवाडे सबस्टेशनमध्ये पाणी शिरल्याने ते बंद पडते. त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या सर्वच भागातील वीजपुरवठा खंडित होतो. भविष्यात अशी समस्या निर्माण होऊ नये, यासाठी सबस्टेशनमधील पॉवर ट्रान्स्फॉर्मर तसेच संलग्न उपकरणे उंचावर बसवावे. खराब झालेले वीज मीटर महावितरणने मोफत बदलून द्यावे.
शेळके मळ्यातील बहुतांशी घरांवरून गेलेली अधिक क्षमतेच्या विद्युत तारा तसेच खराब झालेल्या जुन्या ताराही बदलून देण्याची मागणी आवाडे यांनी केली. बैठकीस इचलकरंजी विभागाचे निरज आहुजा, राहुल पाटील, प्रतीक महाडिक, अमित कळसूर, प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, बंडोपंत लाड, अविनाश कांबळे उपस्थित होते.
फोटो ओळी
२८०७२०२१-आयसीएच-०२
महापुराच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनी महावितरण कंपनीचे पुणे प्रादेशिक विभागाचे अंकुश नाळे व अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.