प्रादेशिक साखर सहसंचालक पदावर डोईफोडे, सचिन रावळ यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 06:01 PM2019-06-08T18:01:07+5:302019-06-08T18:09:19+5:30

विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे यांची पुण्याचे प्रादेशिक साखर सहसंचालक म्हणून बदली झाली आहे, तर कोल्हापूरचे प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांची याच पदावर औरंगाबादला बदली झाली आहे. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणात कार्यरत असलेले श्रीकृष्ण वाडेकर हे आता कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक असणार आहेत. कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक साखर सहसंचालक मात्र अजून ठरलेले नाहीत.

Replace of goofed and Sachin Rawal as Joint Director of Regional Sugar | प्रादेशिक साखर सहसंचालक पदावर डोईफोडे, सचिन रावळ यांची बदली

प्रादेशिक साखर सहसंचालक पदावर डोईफोडे, सचिन रावळ यांची बदली

Next
ठळक मुद्देप्रादेशिक साखर सहसंचालक पदावर डोईफोडे, सचिन रावळ यांची बदलीश्रीकृष्ण वाडेकर नवे विभागीय सहकार सहनिबंधक

कोल्हापूर : विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे यांची पुण्याचे प्रादेशिक साखर सहसंचालक म्हणून बदली झाली आहे, तर कोल्हापूरचे प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांची याच पदावर औरंगाबादला बदली झाली आहे. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणात कार्यरत असलेले श्रीकृष्ण वाडेकर हे आता कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक असणार आहेत. कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक साखर सहसंचालक मात्र अजून ठरलेले नाहीत.

अव्वर सचिव मं. ग. जोशी यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार राज्यातील सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातील १३ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यात कोल्हापुरातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सहकारचे कोल्हापूर विभागीय सहनिबंधक म्हणून कार्यरत असलेले धनंजय डोईफोडे आता पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक पदाचा कार्यभार घेणार आहेत.

त्या जागेवर कार्यरत असलेले शशिकांत घोरपडे यांना पणन संचालनालय पुणेचे सहसंचालक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. त्या जागेवर यापूर्वी कोल्हापुरात प्रादेशिक साखर सहसंचालक म्हणून काम केलेले वाय. व्ही. सुर्वे हे कार्यरत होते. सुर्वे यांना नियुक्तीचे आदेश स्वतंत्ररीत्या काढले जाणार आहेत.


डोईफोडे यांच्या जागेवर पुण्याचेच श्रीकृष्ण वाडेकर हे येत आहेत. त्यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणात काम केले आहे. आगामी वर्षभर कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ, जिल्हा बँक, राजाराम कारखान्यासह बड्या सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका होणार आहेत.

निवडणूक प्राधिकरणात केलेल्या कामाचा अनुभव यावेळी उपयोगी पडणार आहे. डोईफोडे यांनी आपल्या कारकिर्दीत सहकार विभागाला शिस्त लावण्याबरोबरच शेतकरी कर्जमाफीसारख्या क्लिष्ट आणि वेळखाऊ कामातही चांगली चमक दाखविली.


कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक साखर सहसंचालक म्हणून वादग्रस्त कारकीर्द ठरलेले सचिन रावळ यांनी याच पदावर औरंगाबाद विभागात रिक्त जागेवर बदली झाली आहे. रावळ यांच्या जागी अजून कोणाचेही नियुक्तीचे आदेश काढण्यात आलेले नाहीत. ही जागा रिक्त दिसत आहे.

मुळातच गेल्या तीन वर्षांपासून प्रादेशिक साखर सहसंचालक या विभागालाच मरगळ आल्यासारखी स्थिती आहे. एखादा खमका अधिकारी आणण्याची गरज असताना, अजून कुणाचेही आदेश दिले नसल्याने हे पदही रिक्त राहते की काय अशी चर्चा सहकार वर्तुळात सुरू आहे.

मुळातच कोल्हापूर विभागाकडील ३८ कारखाने आणि उच्चांकी गाळपामुळे राज्यात या विभागाचा लौकिक आहे; पण त्याला साजेसा अधिकारी दिला जात नसल्याने प्रादेशिक साखर सहसंचालक हे अधिकारी पद कोल्हापुरात चेष्टेचा विषय आहे.
 

 

Web Title: Replace of goofed and Sachin Rawal as Joint Director of Regional Sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.