तलाठ्याची बदली करा, अन्यथा रास्ता रोको करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:21+5:302021-06-26T04:17:21+5:30
उचगाव : उचगाव (ता. करवीर)येथील गावकामगार तलाठी यांची खातेनिहाय चौकशी करून तत्काळ बदली करावी, अन्यथा उचगाव-हुपरी-कोल्हापूर या रस्त्यावर रास्ता ...
उचगाव : उचगाव (ता. करवीर)येथील गावकामगार तलाठी यांची खातेनिहाय चौकशी करून तत्काळ बदली करावी, अन्यथा उचगाव-हुपरी-कोल्हापूर या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील व प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला. निवेदनात म्हटले आहे की, उचगाव येथील तलाठी कामावर हजर नसतो. नागरिकांना ते अरेरावीची भाषा वापरतात. या कार्यालयातून पैशाशिवाय व एजंटाशिवाय कामे होत नाहीत. तीन महिने तलाठी कार्यालय बंद आहे. तक्रारदारांची सात-बारासाठी अडवणूक होते. त्यामुळे या तलाठ्यांची खातेनिहाय चौकशी करून तत्काळ बदली करा, अन्यथा उचगावमधील सर्वपक्षीय कार्यकर्ते उचगाव-हुपरी-कोल्हापूर या रस्त्यावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन करतील. या निवेदनावर पं. स. सदस्य सुनील पोवार, दीपक रेडेकर, राजू यादव, सचिन देशमुख, कीर्ती मसुटे, सतीश मुसळे, विनायक जाधव, रमेश वाईगडे, अनिल दळवी, अरविंद शिंदे, दीपक काळे, चंद्रकांत गायकवाड, महादेव चव्हाण, गुरुदेव माने, प्रदीप बांगडी, बाळासाहेब नलवडे, सतीश तृके, सचिन नागटिळक, सचिन पाटील, दत्ता यादव, विजय गुळवे, विक्रम चौगुले, अविनाश मोळे, रमाकांत मोराळे, विश्वास हांगीकर, संतोष चोगुले, शरद माळी, सचिन गाताडे यांच्या सह्या आहेत.
फोटो : २५ उचगाव निवेदन
उचगावच्या तलाठ्यांची खातेनिहाय चौकशी व तत्काळ बदली करावी, या मागणीचे निवेदन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संजय मधाळे यांना दिले. यावेळी सुनील पोवार,राजू यादव,दीपक रेडेकर, सचिन देशमुख, कीर्ती मसुटे, अरविंद शिंदे, रमेश वाईगडे उपस्थित होते.
करणार आणि होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार असेल, यांची नोंद घ्यावी, असे प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.