जयसिंगपुरातील २० जणांचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:46 AM2021-03-04T04:46:15+5:302021-03-04T04:46:15+5:30
जयसिंगपूर : शहरातील एका शाळेतील कोरोना पॉझिटिव्ह शिक्षिकेच्या संपर्कातील सतरा शिक्षकांसह तीन विद्यार्थिनींचा अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला ...
जयसिंगपूर : शहरातील एका शाळेतील कोरोना पॉझिटिव्ह शिक्षिकेच्या संपर्कातील सतरा शिक्षकांसह तीन विद्यार्थिनींचा अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, ४५ विद्यार्थिनी व पाच शिक्षकांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
शहरातील एका शाळेतील शिक्षिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्या शिक्षिकेच्या संपर्कात शिक्षक व विद्यार्थिनी आल्या होत्या. त्यापैकी सतरा शिक्षक व तीन विद्यार्थिनींचा अहवाल बुधवारी निगेटिव्ह आला असून मंगळवारी पाच विद्यार्थिनींचा तर बुधवारी ४३ विद्यार्थिनींचे स्वॅब तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत तर ४५ विद्यार्थीनी व पाच शिक्षकांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
दरम्यान, शहरातील शाळांकडून कोरोनाबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. पालिका प्रशासनाकडूनही नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली असून सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील दुसऱ्या गल्लीतील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या संपर्कातील पाचजणांची तपासणी केली जाणार आहे.