चौंडेश्वरी सूतगिरणीची अहवाल सालअखेर ३० कोटी कर्जाची परतफेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:23 AM2021-03-08T04:23:52+5:302021-03-08T04:23:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : सन २०१९-२०२० या सालामध्ये चौंडेश्वरी सूतगिरणीने ८८ कोटींचा व्यवसाय केला आहे. संस्थेने घेतलेल्या ७९ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : सन २०१९-२०२० या सालामध्ये चौंडेश्वरी सूतगिरणीने ८८ कोटींचा व्यवसाय केला आहे. संस्थेने घेतलेल्या ७९ कोटी कर्जापैकी अहवाल सालअखेर ३० कोटी कर्जाची परतफेड केली आहे. पुढील पाच वर्षांमध्ये उर्वरित कर्जाची परतफेड करून संस्था कर्जमुक्त करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे अध्यक्ष सुनील सांगले यांनी सांगितले.
अहवाल सालामध्ये संस्थेने ६३ कोटी १६ लाख रुपये इतक्या किमतीचा कापूस खरेदी केला आहे. ८७ कोटी ३० लाख किमतीची सूतविक्री केली असून, संस्थेस चार कोटी ८६ लाख रुपयांचा व्यापारी नफा झाला आहे. अहवाल सालाअखेर ३१० कंटेनर्स इतके सूत निर्यात केले आहे. कोरोना काळातही संस्थेने सभासदांना सूतदर फरकाचे वाटप केले.
शासकीय नियमानुसार ही वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन झाली. विषयाचे वाचन कार्यकारी संचालक मांतेश महाजन यांनी केले. सभेसाठी सर्व संचालक उपस्थित होते. उपाध्यक्ष श्रीकांत हजारे यांनी आभार मानले.
फोटो ओळी
०७०३२०२१-आयसीएच-०२
चौंडेश्वरी सूतगिरणीच्या ऑनलाईन वार्षिक सभेत सुनील सांगले यांनी मार्गदर्शन केले.