शाहूवाडीत आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:25 AM2021-04-10T04:25:18+5:302021-04-10T04:25:18+5:30
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात आठजणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये उचत, माण, मालेवाडी, रेठरे, सरूड येथील प्रत्येकी ...
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात आठजणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये उचत, माण, मालेवाडी, रेठरे, सरूड येथील प्रत्येकी एक व कोळगावमधील दोन अशा आठ रूग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत मलकापूर ग्रामीण रूग्णालय व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर तालुक्यातील ३२,८६१ नागरिकांनी लस घेतली असून, तालुक्याचे ५७ टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी एच. आर. निरंकारी यांनी सांगितले. जानेवारीपासून आजअखेर ७५ रूग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. आज मलकापूरसह तालुक्यातील सर्वच आरोग्य केंद्रात लसीचा तुटवडा जाणवला. त्यामुळे दुसऱ्या डोसची तारीख असलेले कर्मचारी व ६० वर्षांवरील नागरिक लस न घेताच घरी परतले. तालुका प्रशासनाने वरिष्ठांकडे लसीची मागणी केली आहे.