गडहिंग्लजच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना प्रतिनिधीत्व द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:23 AM2021-03-15T04:23:54+5:302021-03-15T04:23:54+5:30
गडहिंग्लज : गोकुळ दूध संघ व जिल्हा बँक निवडणुकीत गडहिंग्लज तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधीत्व मिळावे, अशी मागणी ग्रामविकास मंत्री ...
गडहिंग्लज : गोकुळ दूध संघ व जिल्हा बँक निवडणुकीत गडहिंग्लज तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधीत्व मिळावे, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मंत्री मुश्रीफ यांच्या गडहिंग्लज दौऱ्यात शिष्टमंडळाने भेटून ही मागणी करण्यात आली. आठवड्यापूर्वी झालेल्या बैठकीत दोन्ही निवडणुका ताकदीने लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
‘गोकुळ’साठी दूध संस्था गटातून महाबळेश्वर चौगुले (माद्याळ काानूल), महिला गटातून सुरेखा बाबूराव चौगुले (खमलेहट्टी), भटक्या विमुक्त जाती-जमाती गटातून गंगाधर व्हसकोटी (हलकर्णी) यांना उमेदवारी मागण्यात आली आहे.
‘केडीसीसी’साठी सेवा संस्था गटातून विद्यमान संचालक संतोष पाटील (कडलगे), भटक्या-विमुक्त जाती गटातून रामाप्पा करिगार (भडगाव), मजूर व पाणीपुरवठा संस्था गटातून उदय जोशी (गडहिंग्लज) यांना उमेदवारी मागण्यात आली आहे.
जिल्हा नेतृत्वाने इच्छुकांना उमेदवारी देऊन चंदगड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिष्टमंडळात, रामाप्पा करिगार, बाबासाहेब पाटील, उदय जोशी, जयकुमार मुन्नोळी, तानाजी शेंडगे, गंगाधर व्हसकोटी आदींचा समावेश होता.
-
* फोटो ओळी : गडहिंग्लज येथे ग्रामविकास हसन मुश्रीफ यांना राष्ट्रवादीतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी रामाप्पा करिगार, बाबासाहेब पाटील, उदय जोशी, जयकुमार मुन्नोळी, तानाजी शेंडगे, गंगाधर व्हसकोटी आदी उपस्थित होते.
क्रमांक : १४०३२०२१-गड-०८