भुदरगडमध्ये नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:18 AM2021-05-03T04:18:57+5:302021-05-03T04:18:57+5:30

गारगोटी : ‘गोकुळ’च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी भुदरगड तालुक्यात चुरशीने ९८.६६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मौनी विद्यापीठ गारगोटी ...

The reputation of the leaders was tarnished in Bhudargad | भुदरगडमध्ये नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

भुदरगडमध्ये नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Next

गारगोटी : ‘गोकुळ’च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी भुदरगड तालुक्यात चुरशीने ९८.६६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मौनी विद्यापीठ गारगोटी येथे मतदान पार पडले. तहसीलदार अश्विनी अडसूळ मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होत्या. गडहिंग्लज उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी मतदान केंद्रावर भेट दिली, तर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ३७४ पैकी ३६९ मतदारांनी मतदान केले. यामध्ये २८० पुरुष, तर ८९ महिलांचा समावेश आहे.

इतिहासात प्रथमच तालुकास्तरावर झालेल्या या निवडणुकीमुळे मतदारांवर नेतेमंडळींचा राजकीय दबाव दिसत होता.

सकाळी आठ वाजता आठ केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी संथगतीने मतदान सुरू होते. सकाळी दहा वाजेपर्यंत ७.७५ टक्के मतदान झाले. सकाळपासून निवडणूक केंद्र निर्मनुष्य झाले होते. दुपारी बारा वाजता ३२.४०टक्के, दोन वाजता ३७४ पैकी ३५७ मतदारांनी हक्क बजावल्याने ९५.४५टक्के , तर एकूण ९८.६६ टक्के मतदान झाले. एकूण ३७४ मतदारांपैकी ३६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आठ केंद्रांमध्ये पाच केंद्रांवर १०० टक्के, तर उर्वरित दोन केंद्रांवर ९६ आणि एका केंद्रावर ९८टक्के मतदान झाले. दुपारी विरोधी आघाडीने पिवळे फेटे, तर पाठोपाठ सत्ताधारी गटाने पांढऱ्या टोप्या परिधान करून मतदारांना एकत्रित आणल्याने मतदानाचा टक्का वाढला.

या मतदान केंद्रावर विद्यामान संचालक धैर्यशील देसाई, विलास कांबळे, तर उमेदवार माजी संचालक धनाजी देसाई, नंदकुमार ढेंगे, रणजितसिंह पाटील यांनी सकाळच्या सत्रात मतदानाचा हक्क बजावला.

..........

मुक्या जनावरांच्या दुधावर बुद्धिमान प्राणिमात्रांच्या लढाया

सकाळी दोन्ही आघाडीच्या बुथमधील रस्त्यातून म्हशी चालल्या होत्या. मुक्या जनावरांच्या दुधावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी बुद्धिमान प्राण्यांची लढाई सुरू असताना ही मुकी जनावरे निवांत दोन्ही बुथमधील रस्त्यावरून जात होत्या.

.........

एकूण मतदान ३७४

झालेले मतदान ३६९

२८० पुरुष

८९ महिला

९८.६६ टक्के

Web Title: The reputation of the leaders was tarnished in Bhudargad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.