सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे न वगळण्याची विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 06:03 PM2020-05-26T18:03:27+5:302020-05-26T18:07:08+5:30

पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रामधून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे वगळू नयेत, अशी विनंती करणारे पत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले असून त्यांच्या आदेशानेच यासंदर्भात आज, मंगळवारी संबंधित गावांची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. ही गावे न वगळण्याबाबत खासदार संभाजीराजे यांनी गेल्याच आठवड्यात वनविभागाला पत्र लिहिले होते.

Request not to exclude 27 villages in Sindhudurg, Kolhapur district | सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे न वगळण्याची विनंती

सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे न वगळण्याची विनंती

Next
ठळक मुद्देसिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे न वगळण्याची विनंतीसह्याद्री व्याघ्र प्रकल्प आज देणार यादी

संदीप आडनाईक 

सिंधुदुर्ग / कोल्हापूर : पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रामधून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे वगळू नयेत, अशी विनंती करणारे पत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले असून त्यांच्या आदेशानेच यासंदर्भात आज, मंगळवारी संबंधित गावांची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. ही गावे न वगळण्याबाबत खासदार संभाजीराजे यांनी गेल्याच आठवड्यात वनविभागाला पत्र लिहिले होते.

''सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि राधानगरी अभयारण्यातील कोअर आणि बफर झोनमधील तसेच तिलारी ते राधानगरी अभयारण्यादरम्यान असलेल्या वन्यजीवांच्या कॉरिडॉरमध्ये असलेल्या सुमारे २७ गावे वगळण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे महत्त्वाच्या गावांचा समावेश आहे.

पश्चिम घाट संवेदशनशील क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी सुमारे २०९२ गावांची अंतिम यादी तयार करण्यात आली. यावर केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांशी गेल्याच आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. त्यात जुन्या यादीतील ३८८ गावे वगळून ३४७ नव्या गावांचा समावेश करण्यात आला.

नव्या यादीत सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सुमारे २७ गावांचे पर्यावरणीय महत्त्व दुर्लक्षित करून नव्या यादीतून वगळण्याचा प्रस्ताव होता. त्याला खासदार संभाजीराजे छत्रपतींनी तीव्र विरोध करून ती गावे न वगळण्याचे पत्र वनविभागाला दिले. त्यानुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने ही गावे न वगळण्याची लेखी विनंती मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली आहे.

ही २७ गावे वगळण्याचा आहे घाट

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प : कोल्हापूर : निवळे (कोअर क्षेत्र), उदगिरी (बफर क्षेत्र ता. शाहूवाडी), सांगली : मणदूर (बफर क्षेत्र, ता. शिराळा), व्याघ्र संवर्धन आराखडा : कोल्हापूर : मानोली, धनगरवाडी, येळवण जुगाई (ता. शाहूवाडी), राधानगरी अभयारण्य क्षेत्र आणि राधानगरी अभयारण्य पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र : सावर्डे, रामणवाडी, पाटपन्हाळा आणि पडसाळी (ता. राधानगरी) , वन्यजीव कॉरिडॉर : कोल्हापूर : भोगोली, पिलानी, कानूर खुर्द, (ता. चंदगड), सिंधुदुर्ग : असनिये, बाबळाट, दाभिल, कोणास, देगवे, फणसवडे, केसारी, आंबेगाव, कुणकेरी, माडखोल, पाडवे माजगाव, सारमाले, तांबोळी (ता. सावंतवाडी)
मुख्यमंत्री कार्यालयाकडे जाणार आज यादी

वगळण्यात येणाऱ्या ३८८ गावांमधील महत्त्वाच्या गावांची वास्तविकता तपासण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्य वन्यजीव विभागाला मिळालेले असून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील वन्यजीवांसंदर्भातील या गावांची यादी आज, मंगळवारी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती वनविभागाकडून मिळाली आहे.
 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रांत सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यांतील ५५ गावांचा समावेश होतो. बफर क्षेत्रात याच जिल्ह्यांतील ८४ गावे समाविष्ट आहेत. या गावांमधील ११ गावांचा समावेश पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळण्यासाठी प्रस्तावित केलेल्या ३८८ गावांमध्ये आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाघ व हत्तींच्या कॉरिडॉरमधील १६ महत्त्वाच्या गावांचा समावेश वगळण्याच्या यादीत आहे. अशा २७ गावांना पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळू नये, अशी विनंती वन्यजीव विभागामार्फत राज्य शासनाला केली आहे.
- सत्यजित गुजर,
क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प.

Web Title: Request not to exclude 27 villages in Sindhudurg, Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.