प्रलंबित प्रश्नांसाठी तेरावेळेला निवेदन
By admin | Published: February 9, 2015 11:15 PM2015-02-09T23:15:13+5:302015-02-09T23:58:57+5:30
प्रशासनाकडून बेदखल : ‘राष्ट्रवादी’ एस. टी. संघटनेचे आमरण उपोषण सुरू
कोल्हापूर : राष्ट्रवादी मजदूर काँग्रेसशी संलग्न राष्ट्रीय एस.टी. कामगार काँग्रेस संघटनेतर्फे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने सोमवारपासून विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरु केले. आज पहिल्या दिवशी खासदार धनंजय महाडिक यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला. मात्र दिवसभर प्रशासनाच्यावतीने कोणीच आंदोलकांची दखल घेतली नाही. संघटनेच्यावतीने ५७ प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी विभाग नियंत्रक सुहास जाधव यांना तेरा वेळेला निवेदन दिले. संघटनेच्यावतीने आमरण उपोषणास बसण्यात येईल, असे इशाऱ्याचे पत्र देवून सुध्दा त्यांनी कोणतीच दखल न घेतल्याने. हे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय कार्यालयासामोर उपोषणास बसण्यात आले. विभागीय अध्यक्ष विजय भोसले व सचिव संजीव चिकुर्डेकर हे दोघेजण उपोषणास बसले आहेत. कामगारांच्या हक्कासाठी हा लढा कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. सायंकाळी महामंडळाचे विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी संभाजी पाटील, कामगार अधिकारी प्रवीण पाटील यांनी भेट घेतली. मात्र आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आर. के. पवार, स्थायी समिती सभापती आदिल फारस यांनी फोन करून पाठिंबा दिला.
संघटनेचे सभासद आर.के. शेटे व आर. एस. पाटील यांच्या अन्यायी पध्दतीने बदल्या केल्या आहेत. त्या पूर्ववत व्हाव्यात
विभागामध्ये पक्षपातीपणे व अन्यायी धोरणाने कमी बेसिकांच्या चालक व वाहकां ऐवजी जादा बेसिक चालक व वाहकांना ओव्हर टाईम व डबल ड्युट्या दिल्या जातात. संभाजीनगर आगारप्रमुख यांच्या पक्षपाती अन्यायी धोरणाबाबत कार्यवाही व्हावी
विनंती बदल्याबाबत संघटनेस न्याय देणे. मनमानी पध्दतीने केलेल्या बदल्या रद्द करावेतकागल आगारातील कार्यरत असलेले वाहक पती-पत्नी यांची साप्ताहिक सुट्टी एकाच दिवशी करावीप्रशासनाकडून संघटनेची होणारी फसवणूक थांबवावी यासह ५७ कोणत्याही प्रवर्गातील बदल्या विनंतीनुसार व क्रमवारीने केलेल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार आहे. आमच्या मागण्या बाबत विभाग नियंत्रकांना पत्र दिले होते. त्यांनी एक वेळेला चर्चा करण्यासाठी बोलविलेही होते. चर्चामध्ये प्रश्न मार्गी लावण्या बाबत आश्वासनही दिले होते. मात्र आमचे प्रश्न मार्गी न लावल्याने आम्ही आंदोलन करत आहे.
- संजीव चिकुर्डेकर
आंदोलनांची दखल नाही
एस.टी. महामंडळाचे संचालक व राष्ट्रवादीचे नेते ए.वाय.पाटील यांना संघटनेच्यावतीने आंदोलनाबाबत रितसर पत्र दिले होते. तरीही त्यांनी आंदोलनांची साधी दखलही घेतली नाही. आपल्याच पक्षांच्या नेत्यांनी संघटनेची दखल घेतली नाही अशी चर्चा आंदोलनस्थळी सुरु होती.