महाडमध्ये कोल्हापुरातील व्हाईट आर्मीतर्फे बचावकार्य सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 01:06 PM2020-08-25T13:06:05+5:302020-08-25T19:17:07+5:30

कोल्हापुरातील व्हाईट आर्मीचे जवान विनायक भाट, नितेश वनकोरे, टीम लीडर प्रदीप ऐनापुरे यांच्या नेतृत्वाखाली १५ लोकांचे पथक  पहाटेपासून महाडमध्ये बचावकार्य करत आहेत अशी माहिती व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी दिली आहे.

Rescue operation started by White Army in Kolhapur in Mahad | महाडमध्ये कोल्हापुरातील व्हाईट आर्मीतर्फे बचावकार्य सुरू

महाडमध्ये कोल्हापुरातील व्हाईट आर्मीतर्फे बचावकार्य सुरू

Next
ठळक मुद्दे‘व्हाईट आर्मी’चे पथक धावले महाडलामाणुसकीची मदत : पंधरा जवान रवाना

महाड/कोल्हापुर : कोल्हापुरातील व्हाईट आर्मीचे जवान विनायक भाट, नितेश वनकोरे, टीम लीडर प्रदीप ऐनापुरे यांच्या नेतृत्वाखाली १५ लोकांचे पथक पहाटेपासून महाडमध्ये बचावकार्य करत आहेत.

पहाटे पाच वाजल्यापासून कोल्हापूरचे व्हाईट आर्मी, त्याचबरोबर एनडीआरएफ आणि स्थानिक इतर एनजीओ यांच्यासोबत सायंकाळी सहा वाजेपर्यंत १४ मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्याच बरोबर विनायक भाट याने ६ वर्षाचा मुलगा १९ तासानी ढिगार्‍यातून सुखरूप जिवंत बाहेर काढले.

जेसीबी आणि पोकलेनच्या साह्याने ढिगारे उपसण्याचे काम सुरू आहे. या कामात व्हाईट आर्मीचे जवान मार्गदर्शन देत आहेत. एखादा मृतदेह किंवा जिवंत व्यक्ती सुखरूपपणे बाहेर काढण्याचा अनुभव असलेल्या व्हाईट आर्मीचे स्पेशल टास्क फोर्स काम करत आहे. सोबत एनडीआरएफचे जवान आहेत स्थानिक प्रशासनचे वेगवेगळे मदत करणारे स्वयंसेवी संस्था आहेत.

व्हाईट आर्मीच्या वतीने पूर्णपणे नियोजनबद्ध बचावकार्य सुरू करण्यात आलेले आहे. अजून ढिगाऱ्याखाली चार ते पाच लोक अडकलेले आहेत, ते कशा अवस्थेत आहेत हे ढिगारे उपसल्यावर समजणार आहे. हे काम आज रात्रभर चालू असणार आहे. उद्या सकाळपर्यंत हे काम पूर्णपणे संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

स्थानिक प्रशासनाच्या सोबत मदत व बचावकार्यासाठी दुर्घटनेत लोकांच्या मदतीसाठी  सोमवारी रात्रीच महाडमध्ये दाखल झालेले  कोल्हापुरातील व्हाईट आर्मीच्या प्रदीप ऐनापुरे, नितेश वनकोरे, विनायक भाट, सुधीर गोरे, निलेश वनकोरे, प्रेम सातपुते, सुमित साबळे, आकाश निरमळे, नितीन लोहार, विकी निरमळे, ओंकार पाटील, अक्षय पाटील, केतन म्हात्रे, शालम आवळे, सिद्धेश पाटील या जवानांनी  पहाटेपासून बचावकार्य करत आहेत अशी माहिती व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी दिली आहे.

महाडमध्ये जी दुर्घटना झाली, त्या काळजीपुरा परिसरातील तारीख गार्डन येथील पाच मजली इमारतीमध्ये एकूण ४१ प्लेट होत्या, त्या कोसळल्या. त्यातून जवळपास ८० जण सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, तर २० जण बेपत्ता आहेत. दुर्घटनेत लोकांच्या मदतीसाठी येथील ‘व्हाईट आर्मी’चे पथक मदतीला धावून गेले आहे. 

कोल्हापूर असो, महाराष्ट्र असो की देश, कोणतेही नैसर्गिक संकट आले किंवा मोठी दुर्घटना घडली की तिथे व्हाईट आर्मी मानवतेच्या भावनेने धावून गेली आहे. कोल्हापुरात गतवर्षी महापुरात आणि यंदा कोरोना संकटात जीव धोक्यात घालून त्यांचे जवान गेली चार महिने समाजाच्या मदतीला धावून गेले आहेत.

Web Title: Rescue operation started by White Army in Kolhapur in Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.