झोपडपट्ट्यांचे पुनर्सर्वेक्षण करा

By admin | Published: August 5, 2016 11:42 PM2016-08-05T23:42:26+5:302016-08-06T00:21:32+5:30

प्रधानमंत्री योजनेतील अर्जदार : पहिल्या दिवशी ८० हरकतींवर सुनावणी

Rescue the slums | झोपडपट्ट्यांचे पुनर्सर्वेक्षण करा

झोपडपट्ट्यांचे पुनर्सर्वेक्षण करा

Next

कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टीमध्ये वास्तव्य असणाऱ्यांच्या ६७५ हरकती अर्जांपैकी शुक्रवारी पहिल्या दिवशी ८० हरकतींवर महापालिकेच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात सुनावणी झाली. मंगळवारी (दि. ९) या हरकतींवरील सुनावणीचा अंतिम दिवस आहे. घराऐवजी पर्यायी जागा द्या, झोपडपट्टीमध्ये वास्तव्य आहे; पण सर्वेक्षण यादीमध्ये झोपडपट्टीचे नाव नाही; त्यामुळे यादीचे पुनर्सर्वेक्षण करून झोपडपट्टीचे नाव समाविष्ट करा, अशा स्वरूपाच्या या हरकती होत्या.
त्यावर पर्यायी जागेचा विषय हा आपल्या अधिकार क्षेत्रात नाही; त्यामुळे या योजनेशिवाय दुसरीकडे जागा देत येत नसल्याचे प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले. महापालिकेच्या हद्दीत १ जानेवारी २००० पूर्वी व त्यानंतर आजअखेर असलेल्या झोपडपट्टीतील कुटुंबाची यादी १ जुलै ते २५ जुलै २०१६ अखेर हरकती स्वीकारण्यात आल्या होत्या. शिवाजी मार्केट येथील कार्यकारी अभियंता कार्यालयामध्ये हरकतींवर शुक्रवारी सुनावणी सुरू झाली. पहिल्या दिवशी ८० जणांच्या हरकती घेण्यात आल्या. या हरकती गांधी मैदान विभागीय कार्यालय क्रमांक एक अंतर्गत असलेले फिरंगाई (प्रभाग क्रमांक ४७), (पद्माराजे उद्यान, संभाजीनगर बसस्थानक, नाथा गोळे तालीम, संभाजीनगर, नेहरूनगर, जवाहरनगर प्रभाग) क्रमांक ५५ ते ६० व ६७ ते ७१ प्रभाग क्रमांक (रामानंदनगर-जरगनगर, कळंबा फिल्टर हाऊस, तपोवन, राजलक्ष्मीनगर, रंकाळा तलाव) व ७३ ते ८१ प्रभाग क्रमांक (फुलेवाडी रिंग रोड, सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर-तुळजाभवानी, साळोखेनगर, शासकीय मध्यवर्ती कारागृह, रायगड कॉलनी-बाबा जरगनगर, सुर्वेनगर, कणेरकर नगर-क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, क्र्रांतिसिंह नाना पाटीलनगर-जीवबा नाना जाधव पार्क) या प्रभागांतील होत्या. दरम्यान, आज, शनिवारी छत्रपती शिवाजी मार्केट
विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागातील हरकतींवर सुनावण्या होणार आहेत. (प्रतिनिधी)


अपुरी कागदपत्रे
या योजनेत समाविष्ट होण्यासाठी अर्ज दाखल करतेवेळी उमेदवारांनी काही शासकीय कागदपत्रे जोडली नव्हती. त्यामध्ये झोपडपट्टीचे नाव यादीत नसणे, सर्वेक्षण न झालेल्या झोपडपट्ट्या, अशा शासकीय बाबींचा अभाव तसेच उमेदवारांच्या अपुऱ्या कागदपत्रांचा समावेश होता.

Web Title: Rescue the slums

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.