देशाच्या प्रगतीस हातभार लावणारे संशोधन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:19 AM2021-05-30T04:19:54+5:302021-05-30T04:19:54+5:30

कसबा बावडा : नावीन्यपूर्ण कल्पनेवर आधारित संशोधनाची गरज असून ते देशाच्या प्रगतीस हातभार लावणारे असावे, अशी अपेक्षा ...

Research is needed to contribute to the progress of the country | देशाच्या प्रगतीस हातभार लावणारे संशोधन गरजेचे

देशाच्या प्रगतीस हातभार लावणारे संशोधन गरजेचे

googlenewsNext

कसबा बावडा : नावीन्यपूर्ण कल्पनेवर आधारित संशोधनाची गरज असून ते देशाच्या प्रगतीस हातभार लावणारे असावे, अशी अपेक्षा शास्त्रज्ञ व जगप्रसिद्ध काविटेशन टेक्निकचे जनक, आयसीटीचे कुलगुरु डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी केली. ते येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाच्यावतीने आयोजित सेमिनारमध्ये बोलत होते.

यावेळी देश तसेच देशाबाहेरील जवळपास पाचशे शिक्षक, संशोधक, पदवीधर व पदवीच्या अनेक शाखेमधील श्रोत्यांची उपस्थिती होती.

महाविद्यालयातील शिक्षकांनी अध्यापनाबरोबरच संशोधन, उद्योग विश्वाची देवाण-घेवाण, तसेच संशोधन प्रस्ताव, निबंध लिहिण्याचे कसब उत्तम शिक्षक बनण्यासाठी गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्राचार्य डॉ. संतोष चेडे, सेमिनार समन्वयक डॉ. अमरसिंह जाधव, प्रा. राधिका धनाल उपस्थित होते.

Web Title: Research is needed to contribute to the progress of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.