संशोधनात उपयुक्त समस्या निवड गरजेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:27 AM2021-05-20T04:27:04+5:302021-05-20T04:27:04+5:30
शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आयोजित ‘संशोधन पद्धती’ या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानमालेतील संशोधन प्रस्ताव तयार करणे, ...
शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आयोजित ‘संशोधन पद्धती’ या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानमालेतील संशोधन प्रस्ताव तयार करणे, या विषयावरील पहिले पुष्प त्यांनी गुंफले. यावेळी प्रा. डॉ. ए. एम. गुरव उपस्थित होते. आपले संशोधन हे आपल्या देशाला, समाजाला व आपल्या विषयाला अधिकाधिक न्याय देणारे असावे, असे आपणांस वाटायला हवे. जेणेकरून आपण आपल्या संशोधनाची समस्या निवड करताना यासाठी आवश्यक घटकांचा विचार आपण करू. संशोधन समस्येची निवड ही बाब आपल्या संशोधनाचा पाया असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. संशोधन समस्येची निवड झाल्यानंतर आपण प्रस्ताव तयार करत असताना संशोधन प्रस्ताव तयार करण्याचे निकष संशोधकाने अभ्यासणे गरजेचे आहे. या निकषाचा आधार घेऊन संशोधकाने आधी झालेल्या संशोधनाचा आढावा घ्यावा. त्यामुळे त्याच्या संशोधनाला योग्य दिशा मिळेल, असेही त्यांनी सांगितले. महेश चव्हाण यांनी आभार मानले.
फोटो (१९०५२०२१-कोल-के बी पाटील (विद्यापीठ)
===Photopath===
190521\19kol_3_19052021_5.jpg
===Caption===
फोटो (१९०५२०२१-कोल-के बी पाटील (विद्यापीठ)