प्रस्थापितांविरुद्धची नाराजी, जातीय समीकरणेच ठरविणार निकाल कागवाड मतदारसंघ : राजू कागे यांचा ‘पंचकार’ की, श्रीमंत पाटील यांचा विधानसभा प्रवेश?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 11:47 PM2018-05-08T23:47:40+5:302018-05-08T23:47:40+5:30

अथणी : प्रस्थापितांविरुद्धची नाराजी महत्त्वाची ठरतेय की, जातीय समीकरणे यावरच यावेळचा कागवाड विधानसभा मतदारसंघातील निकाल ठरणार आहे.

Resentment against establishment, caste equations will decide the results of the cast of Congress: Raju Kage's 'Panchkar', the entry of Shrimant Patil to Vidhan Sabha? | प्रस्थापितांविरुद्धची नाराजी, जातीय समीकरणेच ठरविणार निकाल कागवाड मतदारसंघ : राजू कागे यांचा ‘पंचकार’ की, श्रीमंत पाटील यांचा विधानसभा प्रवेश?

प्रस्थापितांविरुद्धची नाराजी, जातीय समीकरणेच ठरविणार निकाल कागवाड मतदारसंघ : राजू कागे यांचा ‘पंचकार’ की, श्रीमंत पाटील यांचा विधानसभा प्रवेश?

googlenewsNext

चंद्रकांत कित्तुरे ।
अथणी : प्रस्थापितांविरुद्धची नाराजी महत्त्वाची ठरतेय की, जातीय समीकरणे यावरच यावेळचा कागवाड विधानसभा मतदारसंघातील निकाल ठरणार आहे. येथे भाजपचे विद्यमान आमदार राजू कागे आणि काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे. कागे विजयी झाल्यास तो त्यांच्या विजयाचा ‘पंचकार’ ठरणार आहे. तर तीनवेळच्या पराभवाची मालिका खंडित करून श्रीमंत पाटील विजयी झाल्यास ते प्रथमच विधानसभेत प्रवेश करतील.

कागवाड मतदारसंघात कागे, श्रीमंत पाटील, जनता दलाचे कल्लाप्पाण्णा मग्याण्णावर यांच्यासह एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. प्रचारात जोर मात्र काँग्रेस, भाजप आणि जनता दल यांचाच दिसत आहे. येथून राजू कागे १९९९ पासून म्हणजेच गेली १९ वर्षे आमदार आहेत. १९९९ साली काँग्रेसच्या पोपट पाटील यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत राजू कागे यांनी संयुक्त जनता दलाच्या उमेदवारीवर विजय मिळविला होता. २००४ निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविली आणि काँग्रेसचे किरणकुमार पाटील यांना पराभूत करून ते पुन्हा आमदार झाले. २००८ मध्ये त्यांनी काँग्रेसचे दिग्विजय पवार-देसाई यांचा पराभव केला. तर गेल्या म्हणजेच २०१३ च्या निवडणुकीत श्रीमंत पाटील (निधर्मी जनता दल) यांचा पराभव करून कागे यांनी विजयाचा ‘चौकार’ मारला. यंदा ‘पंचकार’ मारतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

काँग्रेसचे श्रीमंत पाटील यांनीही २००८ आणि २०१३ मध्ये निधर्मी जनता दलाच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणूक लढविली आहे. या दोन्ही वेळेला अनुक्रमे त्यांनी १४.७५ आणि ३०.१८ टक्के मते मिळवून ते तिसऱ्या आणि दुसºया क्रमांकावर आले होते. त्याशिवाय २०१४ ची लोकसभा निवडणूकही त्यांनी निधर्मी जनता दलाच्या उमेदवारीवर लढविली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. यावेळी विजयी झाल्यास पराभवाची ही मालिका खंडित करून ते विधानसभेत प्रवेश करतील.

कागे हे गेल्या १९ वर्षांत केलेल्या कामांच्या जोरावर मतदारांना सामोरे जात आहेत. तर श्रीमंत पाटील यांनी कोणतीही सत्ता नसताना ‘अथणी शुगर फार्मर्स’ या साखर कारखान्याच्या माध्यमातून विकासकामे केली आहेत. त्यांनी केंपवाड परिसरात ३४ पाणी योजना राबवून सुमारे १० हजार एकर शेती सिंचनाखाली आणली आहे. कारखान्याच्या माध्यमातून शेतकºयांच्या विकासात योगदान दिले आहे. कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा नेता म्हणून केंपवाड परिसरातील कार्यकर्ते त्यांच्याकडे पाहतात.

कागे यांना गेल्या तीन निवडणुकीत ४४ हजार ५२९ ते ४१ हजार ७८४ या दरम्यान मते मिळाली आहेत. याचाच अर्थ त्यांची व्होट बँक स्थिर असल्याचे दिसते. यावेळीही याच व्होट बँकेच्या जोरावर ते विजयाचा विश्वास व्यक्त करतात.
श्रीमंत पाटील हे मराठा समाजाचे आहेत. प्रस्थापित आमदारांबाबतची नाराजी आणि आपले काम यामुळे आपणच विजयी होणार असल्याचा दावा ते करीत आहेत. यात नेमके कोण बाजी मारणार हे १५ मे रोजी
समजेल.

लिंगायत समाजाचे मतदार सर्वाधिक
या मतदारसंघात जातीय समीकरणही महत्त्वाचे ठरते. राजू कागे हे लिंगायत समाजाचे आहेत. तर श्रीमंत पाटील हे मराठा आहेत. या मतदारसंघात लिंगायत समाजाचे सर्वाधिक मतदार आहेत. त्या खालोखाल मराठा, जैन आणि इतर समाजाची मते आहेत.

शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे
प्रचार शिगेला पोहोचला असताना हवा काँग्रेसची दिसत असली तरी शेवटच्या दोन-तीन दिवसांत मतदारांपर्यंत कोण अधिक पोहोचतो आणि त्याचे मन वळविण्यात कोण यशस्वी होतो, यावरच येथील निकाल अवलंबून असेल

मतदारसंघातील एकूण गावे : ५२
एकूण मते : १ लाख ७८ हजार ७३५
पुरुष मतदार : ९२ हजार २२३
महिला मतदार: ८५ हजार ८१२
इतर : १३

Web Title: Resentment against establishment, caste equations will decide the results of the cast of Congress: Raju Kage's 'Panchkar', the entry of Shrimant Patil to Vidhan Sabha?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.