रेल्वे प्रवाशांनी आरक्षण केले रद्द

By admin | Published: November 12, 2016 06:36 PM2016-11-12T18:36:57+5:302016-11-12T18:36:57+5:30

केंद्र सरकारने ५00, १000 च्या नोटा चलनातून बाद केल्याने पर्यटन वा अन्य कारणांसाठी या आठवडाभरात बाहेरगावी जाणा-या प्रवाशांनी बाहेरगावी गेल्यावर तिथे खर्चासाठी पैशांची अडचण जाणवेल.

Reservation has been done by railway passengers | रेल्वे प्रवाशांनी आरक्षण केले रद्द

रेल्वे प्रवाशांनी आरक्षण केले रद्द

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
कोल्हापूर, दि. १२ -  केंद्र सरकारने ५00, १000 च्या नोटा चलनातून बाद केल्याने पर्यटन वा अन्य कारणांसाठी या आठवडाभरात बाहेरगावी जाणा-या प्रवाशांनी बाहेरगावी गेल्यावर तिथे खर्चासाठी पैशांची अडचण जाणवेल या भीतीने अनेकांनी आरक्षण रद्द केल्याचे चित्र येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर दिसत आहे.
  मंगळवार (दि. ८) पासून ५00 व १000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय मोदींनी जाहीर केल्यामुळे आठवडाभरातील अनेकांनी आपले रेल्वे आरक्षण रद्द केले आहे. बाहेरगावी राहणे, खाणे, फिरणे वा अन्य कारणांसाठी ५00 व १000 च्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत.  एटीएम मशीनही बंद असल्या कारणाने अनेकांनी आपला प्रवासाचा बेत रद्द केला आहे.  
रेल्वे तिकिटांसाठी ५00 व १000 रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात असल्या, तरी हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, सांगली, सातारा अशा पल्ल्यांच्या अनारक्षित गाड्यांच्या जनरल तिकिटांसाठी सुट्टे पैसे देण्याचा आग्रह तिकीट खिडकीवर केला जात आहे. 
गेल्या दोन दिवसांपासून बॅँक, पोस्ट या ठिकाणी नोटा बदलून दिल्या जात आहेत; परंतु त्यासाठी चार हजार रुपयांची मर्यादा आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून बॅँकांच्या दारातील गर्दीत ताटकळत उभे राहूनही पैसे मिळत नाहीत. त्यामुळेही अनेकांनी प्रवासाचे तिकीट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
सरकारच्या सूचनेनुसार १000 व ५00 रुपयांच्या नोटा आरक्षणासाठी व तिकीट खिडकीवरही स्वीकारल्या जात आहेत. सुट्ट्या पैशांची कोणतीही कमतरता जाणवत नसून, जितके पैसे उपलब्ध होतील तितके प्रवाशांना परतही केले जात आहेत. तिकीट आरक्षणासाठी चाळीस हजार रुपये इतकी मर्यादा सरकारने घातली असून, त्यापुढील रकमेवरील तिकिटे आरक्षित केली जात नाहीत. तिकिटे आरक्षित करणे वा रद्द करणे हे व्यवहार नेहमीप्रमाणेच सुरळीत सुरू आहेत.
 -प्यारेलाल मीना, वरिष्ठ आरक्षण लिपिक.

Web Title: Reservation has been done by railway passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.