आरक्षण पुनर्विचार परिषद उधळून लावणार

By admin | Published: February 27, 2017 11:51 PM2017-02-27T23:51:30+5:302017-02-27T23:51:30+5:30

आरक्षण समर्थन समितीचा इशारा : परिषदेसाठी केशवराव भोसले नाट्यगृह न देण्याचे महापौरांना निवेदन

The Reservation Rehabilitation Council will be fired | आरक्षण पुनर्विचार परिषद उधळून लावणार

आरक्षण पुनर्विचार परिषद उधळून लावणार

Next

कोल्हापूर : आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मभूमी व कर्मभूमीत ‘लोकमंच’तर्फे होणाऱ्या आरक्षण पुनर्विचार चळवळ परिषदेस महानगरपालिकेने केशवराव भोसले नाट्यगृह उपलब्ध करून देऊ नये. पुनर्विचार परिषदेच्या आडून कोणी आरक्षणाला विरोध करणार असेल, तर ती परिषदच उधळून लावू , असा इशारा सोमवारी राजर्षी शाहू महाराज आरक्षण समर्थन समितीतर्फे देण्यात आला. कोल्हापुरात स्थापन झालेल्या आरक्षण समर्थन समितीच्या शिष्टमंडळाने महापौर हसिना फरास यांची भेट घेऊन आरक्षण समर्थन समितीचे अध्यक्षपद स्वीकारून येथून पुढे होणाऱ्या लढ्याचे नेतृत्व करावे, असे आवाहन केले; परंतु महापौर फरास यांनी ही विनंती विनम्रपणे नाकारून लढ्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
माजी नगरसेवक सुनील मोदी यांनी २५ मार्चला कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात आरक्षण पुनर्विचार चळवळ परिषदेचे आयोजन केले आहे. तसेच त्यांनी काही मागण्याही केलेल्या आहेत. ही परिषद म्हणजे सध्याच्या आरक्षण पद्धतीला विरोध करणारी आहे. त्यामुळे त्यासाठी महानगरपालिकेने नाट्यगृह उपलब्ध करून देऊ नये, अशी मागणीही यावेळी महापौरांकडे करण्यात आली. ओबीसींना आरक्षण मिळू नये, अशी ‘लोकमंच’ संघटनेची इच्छा आहे. या चळवळीमागे मोठे षङ्यंत्र आहे. त्यामुळे त्याला विरोध करून त्यांचे मनसुबे उधळून लावले पाहिजेत, अशा भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली. जर का नाट्यगृह उपलब्ध करून दिले तर ही परिषद उधळून लावली जाईल, असा इशाराच देण्यात आला. महापौरांना भेटलेल्या शिष्टमंडळात माजी महापौर नंदकुमार वळंजू, मारुतराव कातवरे, माजी उपमहापौर चंद्रकांत सांगावकर यांच्यासह व्यंकाप्पा भोसले, दिगंबर लोहार, सुभाष देसाई, प्रकाश कुंभार, सुजय पोतदार, किसन कल्याणकर, जहाँगीर अत्तार, बाळासाहेब भोसले, अस्लम बागवान, अशोक माळी, शिवानंद माळी, शीतल मंडपे, सुधाकर पेडणेकर, आदींचा समावेश
होता. (प्रतिनिधी)

...तर रस्त्यावर उतरू : फरास सुनील मोदी कोणी मोठा माणूस नाही. त्यांच्या परिषदेमुळे आरक्षणही बदलणार नाही; परंतु त्यांच्या परिषदेच्या आडून कोणी ओबीसी आरक्षणाला आव्हान देत असेल तर अशा प्रवृत्ती कोल्हापूरच्या बाहेर हाकलण्याची ताकद दाखवून दिली जाईल. प्रसंगी त्यासाठी रस्त्यावर येऊ, असा इशारा माजी नगरसेवक आदिल फरास यांनी दिला. परिषदेस नाट्यगृह उपलब्ध करून दिले जाणार नाही, असे स्थायी सभापती संदीप नेजदार यांनी सांगितले.

Web Title: The Reservation Rehabilitation Council will be fired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.