जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत कोल्हापुरात

By admin | Published: September 29, 2016 01:17 AM2016-09-29T01:17:41+5:302016-09-29T01:18:21+5:30

प्रारूप रचनेबाबतही उत्सुकता : पंचायत समिती सोडत तालुका पातळीवर

Reservation of Zilla Parishad in Kolhapur | जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत कोल्हापुरात

जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत कोल्हापुरात

Next

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत ही कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ५ आॅक्टोबरला निघणार असून याच दिवशी पंचायत समितीचीही आरक्षण सोडत तालुका पातळीवर काढण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. २७) याबाबतची अधिकृत घोषणा केली असून, यामुळे आरक्षण आणि प्रारूप रचना या दोन्हींबाबतची इच्छुकांची उत्सुकता वाढली आहे.
फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. त्यासाठीची अनुसूचित जातीजमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला राखीव जागा या जागांसाठीची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ताराराणी सभागृहात दुपारी तीन वाजता होणार आहे. तसेच पंचायत समितीसाठीची आरक्षण सोडत
त्या-त्या तालुका पातळीवर सकाळी ११ वाजता पंचायत समिती, नगरपालिका सभागृह, महसूल भवन अशा सोयीच्या ठिकाणी काढण्यात येणार आहे. याबाबतचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
शाहूवाडी येथे पंचायत समिती सभागृहात, पन्हाळा येथे मयूर बागेतील सांस्कृतिक सभागृहामध्ये, हातकणंगले व शिरोळ येथील सोडत महसूल भवनमध्ये, कागलची सोडत तहसीलदार कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहामध्ये, करवीरची सोडत पंचायत समितीच्या सभागृहामध्ये, गगनबावड्याची सोडत नवीन प्रशासकीय भवन, तहसीलदार कार्यालय येथे, राधानगरीची सोडत तहसीलदार कार्यालय येथे, भुदरगडची सोडत नवीन प्रशासकीय इमारत, पंचायत समिती येथे, आजऱ्याची सोडत तहसीलदार कार्यालयात, गडहिंग्लजची सोडत नगरपरिषदेच्या सभागृहात व चंदगडची सोडत पंचायत समितीच्या सभागृहात होणार आहे.

Web Title: Reservation of Zilla Parishad in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.