परदेशात स्थायिक मुला-मुलींच्या पालकांची संघटना- : ‘एन.आर.आय.पेरेंटस्’मध्ये सहभागाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:58 AM2019-07-02T00:58:52+5:302019-07-02T00:59:26+5:30

परदेशामध्ये राहणाऱ्या मुला-मुलींच्या पालकांची ‘एन.आर.आय. पेरेंटस्’ ही संघटना कोल्हापुरात स्थापन करण्यात येणार आहे. महिला सबलीकरण आणि प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये अग्रेसर असलेल्या येथील ‘स्वयंसिद्धा’ संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे.

Resident children and girls' parents association abroad | परदेशात स्थायिक मुला-मुलींच्या पालकांची संघटना- : ‘एन.आर.आय.पेरेंटस्’मध्ये सहभागाचे आवाहन

परदेशात स्थायिक मुला-मुलींच्या पालकांची संघटना- : ‘एन.आर.आय.पेरेंटस्’मध्ये सहभागाचे आवाहन

Next
ठळक मुद्दे‘स्वयंसिद्धा’च्या प्रेरणेतून नवा उपक्रम

कोल्हापूर : परदेशामध्ये राहणाऱ्या मुला-मुलींच्या पालकांची ‘एन.आर.आय. पेरेंटस्’ ही संघटना कोल्हापुरात स्थापन करण्यात येणार आहे. महिला सबलीकरण आणि प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये अग्रेसर असलेल्या येथील ‘स्वयंसिद्धा’ संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये जे सहभागी होऊ इच्छितात त्यांनी १४ जुलैपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. १८ जुलैला दुपारी ४ वाजता या संस्थेच्या कामाची सुरुवात करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांमध्ये कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील हजारो मुले आणि मुली उच्चशिक्षण घेऊन परदेशात स्थायिक झाली आहेत. यातील अनेकजण काही कालावधीसाठी परदेशात गेले असले तरी अनेकजण तिथेच स्थायिक झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर त्यांचे आई-वडील कोल्हापुरात किंवा आपापल्या गावी राहत आहेत. परदेशात राहणाºया मुलांना सातत्याने भारतामध्ये येणे शक्य नसल्याने इकडे राहणाºया आई-वडिलांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच अशां मुला-मुलींच्या पालकांना एकत्र करण्याची कल्पना रुईकर कॉलनीमध्ये वास्तव्यास असणाºया जगदीश जोशी आणि मनीषा जोशी यांनी मांडली आहे.

हे दोघेही आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत होते. त्यांची मुलगीही परदेशामध्ये स्थायिक आहे. त्यामुळे त्यांना या वाटचालीमध्ये येणाºया अडचणींची माहिती आहे. अशाच अडचणी इतर पालकांना येतात. एकाकीपणा येतो. निर्णय घेताना चर्चा आवश्यक वाटते म्हणूनच अशा परदेशात स्थायिक झालेल्या मुला-मुलींच्या पालकांना एकत्र आणण्याची कल्पना ‘स्वयंसिद्धा’च्या कांचनताई परुळेकर यांच्याकडे मांडली. त्यांनीही या कल्पनेला दाद देऊन सहभाग घेण्याचा निर्णय घेतला.


उद्दिष्ट्ये
नवीन समविचारी मैत्रीची सुरुवात
कलागुणांना व्यासपीठ.
जीवन आनंददायी बनविण्यासाठीचे उपक्रम.
सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग.
या सर्व बाबींच्या माध्यमातून मुले, मुली आपल्यापासून दूर असली तरी आपण जीवनात आनंद घेण्याची वृत्ती जोपासणे.

 

मी आणि माझे पती जगदीश दोघेही पुण्यात नोकरीला होतो. आता निवृत्तीनंतर पुन्हा कोल्हापुरात राहायला आलो आहोत. आमची मुलगी आॅस्ट्रेलियामध्ये गेली १४ वर्षे वास्तव्यास आहे. नातवंडे आमच्यासोबत नाहीत. याची सल मनामध्ये आहे; पण वास्तव स्वीकारले पाहिजे. आमच्या या भावना समदु:खी असणारेच समजू शकणार. अशा सर्वांना एकत्र करून उर्वरित आयुष्य आनंदामध्ये घालविण्यासाठी हे संघटन करत आहोत. - मनीषा जोशी

Web Title: Resident children and girls' parents association abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.