कुरुंदवाडवासीयांची दु:ख सावरत उभारी -: महापुराच्या फटक्याने मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 01:06 AM2019-08-18T01:06:14+5:302019-08-18T01:07:24+5:30

कष्टाने पिकविलेली शेती, संसार, व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या दु:खाला पारावारच राहिला नाही. मात्र, असे असले तरी पूर ओसरताच शहरवासीय दु:ख चघळत न बसता नव्या उमेदीने उभारी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Residents of Kurundwad rise to grief - | कुरुंदवाडवासीयांची दु:ख सावरत उभारी -: महापुराच्या फटक्याने मोठे नुकसान

कुरुंदवाड येथे विविध सामाजिक कार्यकर्ते शहरात स्वच्छता मोहीम राबवित आहेत. दुसºया छायाचित्रात कुरुंदवाड शहर शंभर टक्के पूरग्रस्त जाहीर झाल्याने प्रत्येक कुटुंबाला शासनाकडून पाच हजाराच्या रोख रकमेचे गावचावडीमध्ये वाटप सुरू आहे. त्यासाठी शहरवासीयांची रांग लागली आहे. कुरुंदवाड येथे महापुराने संपूर्ण घरच कोसळले आहे.

Next
ठळक मुद्दे शेतकऱ्यांना सधन बनवणारी कृष्णा-पंचगंगा बनली महापुराच्या रूपाने काळ

गणपती कोळी -- आॅन दी स्पॉट  कुरुंदवाड

कुरुंदवाड : कृष्णा-पंचगंगेच्या काठावर वसलेले कुरुंदवाड हे शहर मुबलक पाणी, सुपीक जमीन आणि कष्टाळू शेतकरी यामुळे सधन बनले आहे. मात्र, नैसर्गिक वरदान लाभलेल्या या नद्यांनी महापुराने होत्याचे नव्हते केले आहे. कष्टाने पिकविलेली शेती, संसार, व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या दु:खाला पारावारच राहिला नाही. मात्र, असे असले तरी पूर ओसरताच शहरवासीय दु:ख चघळत न बसता नव्या उमेदीने उभारी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कुरुंदवाड हे संस्थानकालीन शहर आहे. शहराला कृष्णा व पंचगंगा नदीने वळसा घातल्याने पाण्याची कमतरता कधीच भासली नाही. इतकेच नव्हे, तर शहराला पाणी कधीच कमी पडू नये यासाठी संस्थानिकांनी पंचगंगेपासून भैरववाडी-कुरुंदवाड दरम्यान कृत्रिम नदी नेली आहे. त्यामुळे बारमाही पाण्याचा वापर शेतीसाठी, शहरासाठी करून शेतीतून सोने पिकवित आहे.

या कष्टाला महापुराने दृष्ट लावली. गावचावडीसमोरील व माळभागावरील काही भाग वगळता शहर पूर्णपणे पाण्याखाली होते. चोहोबाजूंनी पाणी आल्याने महापुरात शहर दहा दिवस बेट झाले होते. शहरात पाणी वाढत गेल्याने नागरिकांनी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आहे त्या कपड्यावर शहर सोडून सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. मात्र, कृष्णा व पंचगंगेने रौद्ररूप धारण केल्याने काडी-काडी जमवून संसार उभे केलेल्या शेकडो कुटुंबांचे संसार पाण्याचा लाटेत वाहून गेले आहेत. लष्कर, एनडीआरएफच्या पथकांनी नागरिकांचे जीव वाचविले असले तरी कुटुंबाचा आधार असलेली दुभती जनावरे वाहून गेली आहेत. त्यामुळे उदरनिर्वाह करावयाचे की, मोडलेला संसार उभा करावयाचा? हा प्रश्न कुटुंबासमोर उभा आहे.

मात्र, येणाºया संकटाला धैर्याने तोंड देणाºया शहरवासीय पूर ओसरताच दु:ख विसरून नव्या जोमाने स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासन, सामाजिक संस्था, पालिका प्रशासनाच्या साथीने नागरिक पुरामुळे घाण झालेले शहर स्वच्छ करीत आहेत. स्थलांतरित कुटुंबप्रमुख कुटुंबाला न आणता घर, परिसर स्वच्छ करून मगच कुटुंबाला घरी आणत आहेत. शहर शंभर टक्के पूरग्रस्त असल्याने गावचावडीमध्ये प्रत्येक कुटुंबाला शासनाकडून पाच हजारांची अनुदानाची रक्कम दिली जात आहे. पालिका प्रशासन प्रथम शहर स्वच्छतेला महत्त्व देत असून, पडझड झालेल्या घरांचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत.


शेतक-यांना भरीव मदत द्यावी
कुरुंदवाड शहर हे प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. मात्र, महापुराने शेतीची धूळधाण केली असून, शेतकºयांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान दिले असले तरी नुकसानग्रस्त शेतकºयांना व त्यावर अवलंबून असणाºया शेतमजुरांना भरीव मदत देण्याची मागणी होत आहे.

साथी रोखण्यासाठी आरोग्य तपासणी
पूर ओसरल्याने साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्याने
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, अजय हेल्थ केअर (पुणे) यांचे पथक शहरात आरोग्य तपासणी मोहीम राबवित आहेत. त्यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलने आठ ठिकाणी, तर अजय हेल्थ केअरने पाच ठिकाणी तपासणी व उपचार शिबिर राबविले आहे.

शैक्षणिक कागदपत्रांचे नुकसान
शहर व परिसरातील २७ गावांमधील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण देणाºया येथील सहकार भूषण
एस. के. पाटील महाविद्यालयही या महापुरातून सुटले नाही. माळभागावर असलेल्या या महाविद्यालयातील तळमजला पाण्याखाली होता. त्यामुळे शैक्षणिक साहित्याबरोबरच महत्त्वाची कागदपत्रे भिजून नष्ट झाली आहेत.

स्वच्छतेवर भर
पुरामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, पालिकेच्या आरोग्य कर्मचाºयांबरोबर विविध सामाजिक संघटना, शहरातील मंडळे स्वच्छता मोहीम राबवित आहेत.



 

Web Title: Residents of Kurundwad rise to grief -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.