कचरा उठावाचा ठराव करून आमदार आवाडे यांना द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:27 AM2021-02-11T04:27:31+5:302021-02-11T04:27:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नगरपरिषदेने घनकचरा प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा कौन्सिल सभेचा ठराव करून दिल्यास कचरा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपरिषदेने घनकचरा प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा कौन्सिल सभेचा ठराव करून दिल्यास कचरा फुकट उचलला जाईल, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले आहे. त्यानुसार ठराव करून नगरपालिकेने त्यांना द्यावा, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक शशांक बावचकर यांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांना दिले.
निवेदनात, १६ डिसेंबर २०१९ च्या आढावा बैठकीत घनकचरा प्रकल्पासाठी २२ कोटी रुपयांचा खर्च करण्यापेक्षा तो कचरा फुकट उललला जाईल. त्यासाठी नगरपालिकेने कौन्सिल सभेत ठराव करून द्यावा, असे आवाडे यांनी म्हटले होते. दरम्यान, ४ फेब्रुवारी २०२१ ला आरोग्य सभापतींसह आवाडे यांनी कचरा डेपोस भेट दिली. त्यावेळी प्रकल्पावर अद्यापही चार ते पाच लाख टन कचरा शिल्लक आहे. त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे हा कचरा आम्ही फुकट उचलतो म्हणत असतानाही नगरपालिका देत नसल्याचे आवाडे यांनी पुन्हा बोलून दाखविले होते. ही बाब अत्यंत गंभीर असून कचऱ्याचा प्रश्न कोणताही खर्च न करता कायमस्वरूपी निकालात निघत असेल, तर त्याबाबत ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.