समाजाचे प्रश्न नव्या पिढीने सोडवावेत : संपतराव पवार-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 04:50 PM2017-08-17T16:50:16+5:302017-08-17T16:53:06+5:30
कोल्हापूर : नव्या पिढीने जुन्या पिढीच्या कामाच्या शिदोरीवर झोकून काम करावे. समाजात आज अनेक नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. ते सोडविण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी नव्या पिढीने सज्ज राहिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी येथे केले.
कोल्हापूर : नव्या पिढीने जुन्या पिढीच्या कामाच्या शिदोरीवर झोकून काम करावे. समाजात आज अनेक नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. ते सोडविण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी नव्या पिढीने सज्ज राहिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी येथे केले.
भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कोल्हापूर शाखेच्या १७ व्या अधिवेशनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहर चिटणीस बाबूराव कदम होते. माजी आमदार पवार-पाटील म्हणाले, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरला, तर त्याची शासनाला दखल घ्यावीच लागते. यासाठी पक्षाने समाजाची बांधीलकी जोपासली आहे.
या कार्यक्रमात संतराम पाटील, टी. एस. पाटील, अॅड. उज्ज्वला कदम, सुनीलकुमार सरनाईक, भाऊ घोगले, सुनंदा मोरे, स्वप्निल पाटोळे, भारत पाटील, कुमार जाधव, बाळासाहेब देसाई, सुभाष सावंत, मधुकर हरेल यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी दत्ता पाटील, एकनाथ पाटील, अंबाजी पाटील, मोहन पाटील, मनोहर पाटील, विजय लोंढे, जितेंद्र चव्हाण, आदी उपस्थित होते. संभाजीराव जगदाळे यांनी स्वागत केले. सुशांत बोरगे यांनी अहवाल वाचन केले. अशोक चव्हाण यांनी आभार मानले.
कार्यकर्त्यांच्या जोरावर लढत
अनेक पक्ष उदयास आले. सत्ता मिळविण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक लढत राहिला. पक्षाचे अस्तित्व आजही टिकून आहे, असे माजी आमदार पवार-पाटील यांनी सांगितले.
कोल्हापुरात शेतकरी कामगार पक्षाच्या १७ व्या अधिवेशनात माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी दत्ता पाटील, कुमार जाधव, भारत पाटील, बाबूराव कदम, बबेराव जाधव, टी. एस. पाटील, एकनाथ पाटील, संभाजीराव जगदाळे उपस्थित होते.