शाहू स्टेडियमचा प्रश्न सोडवू;पालकमंत्र्यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:58 AM2019-01-28T00:58:26+5:302019-01-28T00:58:30+5:30
कोल्हापूर : छत्रपती शाहू स्टेडियम सरकार हक्कात घेण्याच्या निर्णयाला नक्कीच स्थगिती मिळेल; त्यामुळे हा विषय संपला असून, कोल्हापूरकरांनी काळजी ...
कोल्हापूर : छत्रपती शाहू स्टेडियम सरकार हक्कात घेण्याच्या निर्णयाला नक्कीच स्थगिती मिळेल; त्यामुळे हा विषय संपला असून, कोल्हापूरकरांनी काळजी करू नये, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (दि. २६) दिली. याबाबत दिलीप देसाई यांनी जर न्यायालयात कॅव्हेट दाखल केले नसते, तर शुक्रवारीच (दि. २५) या निर्णयाला स्थगिती दिली असती, असेही त्यांनी सांगितले.
शाहू स्टेडियमसह इतर मिळकती सरकार हक्कात जमा करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयामुळे शहरवासीयांत अस्वस्थता पसरली आहे. या स्टेडियमवर सुरू असलेल्या खेळांचे, सामन्यांचे काय होणार? अशी चिंता आहे; त्यामुळे शहरातील तालीम संस्था, फुटबॉल संघ, खेळाडू तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ कार्यकर्ते निवास साळोखे, शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, राष्टÑवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या पुढाकाराने शनिवारी (दि. २६) सकाळी साडेअकराच्या सुमारास पालकमंत्री पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवास साळोखे म्हणाले, जिल्हाधिकाºयांच्या निर्णयाने या ठिकाणी सामने भरविणाºया संस्थांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. हा निर्णय म्हणजे खेळ बंद पाडण्यासाठीच असून, यामुळे फुटबॉलचे नुकसान होणार आहे; त्यामुळे पालकमंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती देऊन, तो पूर्ववत करावा.
याबाबत चिंता करण्याची गरज नाही; कारण हा विषय आता संपला आहे. जर देसाई यांनी याबाबत कॅव्हेट दाखल केले नसते, तर शुक्रवारी (दि. २५)च त्याला स्थगिती दिली असती. आता हा विषय विभागीय आयुक्तांकडे गेला आहे. त्यांच्या पातळीवर हा विषय संपून स्थगिती मिळेल. त्यांच्याकडून नाही झाले, तर मी आहेच, मलाही अर्धन्यायिक अधिकार आहेत; त्यामुळे त्याचा वापर खेळाडूंसह जनतेसाठी करू, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, रेफ्री असोसिएशनचे श्रीनिवास जाधव, चंद्रकांत यादव, संदीप देसाई, उद्योजक चंद्रकांत जाधव, बाबा पार्र्टे, अजित राऊत, लालासाहेब गायकवाड, जयकुमार शिंदे, राजेश बाणदार, विक्रम जरग, अॅड. पंडितराव सडोलीकर, सुहास साळोखे, अनिल घाटगे, अशोेक पोवार, रमेश मोरे, प्रसाद जाधव, किसन कल्याणकर, आर. डी. पाटील, नरेंद्र पायमल, राजू माने, विनायक फाळके, विवेक कोरडे, प्रमोद पोवार, मनोज बालिंगेकर, इंद्रजित साळोखे, आदी उपस्थित होते.
पालकमंत्री अनभिज्ञ
शाहू स्टेडिमय सरकार हक्कात घेण्यासाठी दोन-अडीच वर्षे यासंदर्भात जिल्हाधिकाºयांकडे केस सुरूआहे. हे माहीत असूनही यासंदर्भात कोणीही आपल्याशी बोलले नसल्याचे सांगून स्टेडियमसह मिळकती सरकारजमा करण्याच्या निर्णयानंतरच आपल्याला हे कळाल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले तरीही जिल्हाधिकाºयांशी शुक्रवारी (दि. २५) आपण चर्चा केली. खेळाडंूसह कोल्हापूरकरांच्या अस्मितेच्या विषयासंदर्भात इतका मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही माझ्याशी का बोलला नाही?, अशी विचारणा जिल्हाधिकाºयांना केली. त्यावर दररोज दिलीप देसाई यांनी कार्यालयात येऊन अक्षरश: मानेवर बसून हा निर्णय घेणे भाग पडल्याचे उत्तर त्यांनी दिल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
दिलीप देसाई यांची चौकशी करा
शाहू स्टेडियम सरकार हक्कात घ्यावे, या मागणीसाठी न्यायालयात गेलेल्या दिलीप देसाई यांचा खरपूस समाचार उपस्थितांनी घेतला. देसाई यांनी हा विषय उकरून काढून, जनता व खेळाडूंना वेठीस धरण्याचे काम केले आहे. ते प्रत्येक ठिकाणी तोंड घालत आहेत, त्यांची पालकमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.