विरोधी उमेदवारांबद्दल आदर, पक्षनिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:51 AM2019-04-05T00:51:43+5:302019-04-05T00:51:47+5:30

मी मूळची कºहाडची. माझे वडील वासुदेव किरपेकर हे स्वातंत्र्यसेनानी. सक्रिय चळवळीमुळे त्यांना सहा वर्षांचा तुरुंगवास झाला होता. येरवडा जेलमध्ये ...

Respect for anti-contestants, party leaders | विरोधी उमेदवारांबद्दल आदर, पक्षनिष्ठा

विरोधी उमेदवारांबद्दल आदर, पक्षनिष्ठा

Next

मी मूळची कºहाडची. माझे वडील वासुदेव किरपेकर हे स्वातंत्र्यसेनानी. सक्रिय चळवळीमुळे त्यांना सहा वर्षांचा तुरुंगवास झाला होता. येरवडा जेलमध्ये ते आणि यशवंतराव चव्हाण एकाच बरॅकमध्ये होते. माझ्या घरी कायमच यशवंतरावांसह अनेक मोठ्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा राबता असायचा. त्यावेळी काँग्रेसचे चिन्ह होते बैलगाडी. पुढे हात चिन्ह आले.
मी जो काळ पाहत मोठी झाले, वाढले त्या काळात उमेदवार एकमेकांचा आदरपूर्वक उच्चार करायचे. पक्ष असो वा व्यक्ती दोन्ही पातळींवर एका मर्यादेचे पालन केले जायचे. समजुतीने निर्णय घेतले जायचे. आपण संसदेत जाण्याकरीता ज्या पदासाठी निवडणूक लढवत आहोत त्या पदाचा सन्मान आणि आदर राखून प्रचारात भाषा वापरली जायची. निवडणुका आल्या की शहरात वेगळेच वातावरण असायचे. त्यावेळी यशवंतराव चव्हाण कºहाडमधून लढायचे, तेव्हा आजच्यासारखी हायटेक प्रचारयंत्रणा नव्हती. त्यामुळे कितीही मोठा नेता असला तरी घरोघरी जाऊन, प्रत्येक मतदाराला भेटून आपल्याला मतदान करण्यासाठी आवाहन करायचे. कोणताही डामडौल नाही की अफाट खर्च नाही. मी पहिल्यांदा मतदान केले १९६९-७०च्या दरम्यान तेही कोल्हापुरात. त्यावेळी आपल्या मताला, विचारांना काही महत्त्व आहे या जबाबदारीची जाणीव झाली. त्यावेळी नेत्यांमध्ये पक्षनिष्ठा असायची. त्यांच्या ‘शब्दा’वर जनतेचा विश्वास बसायचा आणि नेतेही दिलेले आश्वासन पूर्ण करायचे. प्रश्न सोडवायचे. आता ती विश्वासार्हता राहिलेली नाही. त्यामुळे कोणताही उमेदवार निवडून आला तरी सर्वसामान्यांच्या परिस्थितीत काही फरक पडत नाही असे एक निराशाजनक चित्र आहे.
गेल्या काही वर्षांत निवडणुकीतील प्रचाराने खालचे टोक गाठले आहे. जिंकणे हे उद्दिष्ट असले तरी त्यात आजच्यासारखी एकमेकांवर जहरी आणि हीन टीका
केली जात नसे किंवा दुसऱ्याला ठरवून खाली खेचण्यासाठीची स्पर्धा नव्हती. आता निवडणुकीच्या काळात आणि इतरवेळीही जे काही घडतंय ते आमच्यासारख्यांच्या बुद्धीपलीकडचे आहे. आपला
नेमका अजेंडा काय, आपले विचार काय, आपण काय करतोय आणि नेमकं काय साधायचंय याबद्दल कार्यकर्तेच काय नेत्यांचीही दृष्टी धूसर झाली आहे, असे दुर्दैवाने वाटते.
-डॉ. वासंती टेंबे, जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका

Web Title: Respect for anti-contestants, party leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.