नेत्यांच्या शब्दाचा मान राखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2016 12:50 AM2016-02-22T00:50:12+5:302016-02-22T01:06:35+5:30

हसन मुश्रीफ : गडहिंग्लज कारखाना निवडणुकीसाठी कोल्हापुरात बैठक

Respect the leader's words | नेत्यांच्या शब्दाचा मान राखा

नेत्यांच्या शब्दाचा मान राखा

Next

गडहिंग्लज : विधानसभेला कुणी मदत केली, कोण विरोधात गेले हा नंतरच प्रश्न आहे. मात्र, विधानसभा निवडणुका आणि गडहिंग्लज कारखाना चालवायला देताना आगामी राजकारणात एकत्र काम करण्याचा शब्द प्रकाश चव्हाण यांना दिला आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेऊनच आघाडी होईल. कार्यकर्त्यांनी नेत्यांनी दिलेल्या शब्दाचा मान राखावा, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
गडहिंग्लज कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आयोजित राष्ट्रवादी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. व्यापक आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, राष्ट्रवादी पक्षाचे पॅनेल म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. आमदार संध्यादेवी कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुश्रीफ म्हणाले, दौलत बंद पडल्यामुळे शेतकरी व कामगार यांचे सुरू असलेले हाल आणि व्यथा चंदगड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी पहायला मिळाल्या. तशी अवस्था गडहिंग्लजकरांची होऊ नये, म्हणूनच कारखाना चालवायला देण्यासाठी आपण पुढाकार घेतला.
आमदार कुपेकर म्हणाल्या, कार्यकर्त्यांच्या भावनेशी व मतांशी आपण सहमत आहोत. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. बी. एन. पाटील, उदय जोशी, शिवप्रसाद तेली व जयकुमार मुन्नोळी, दीपक जाधव, शिवाजी खोत, सतीश पाटील, सदानंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
ताकद व क्षमता लक्षात घेऊनच आघाडीतील जागा वाटप व्हावे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना योग्य न्याय मिळावा अशी सूचना जयसिंग चव्हाण व अमर चव्हाण यांनी केली. यावेळी रामाप्पा करिगार, उपसभापती तानाजी कांबळे, जितेंद्र शिंदे, रघुनाथ पाटील, टी. एल. धुमाळ, इकबाल काझी, आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
अविश्वास ठरावाशी संबंध नाही
गडहिंग्लज कारखान्याचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्याविरुद्ध त्यांच्याच सहकाऱ्यांनी अविश्वास ठराव आणला होता, तो त्यांच्यातील अंतर्गत राजकारणाचा भाग आहे. त्याच्याशी आपला काडीमात्र संबंध नाही. मात्र, त्यानंतर कारखाना चालविण्यासाठी मदतीची विनंती केल्यामुळेच चव्हाण यांना मदत केली, असेही मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)

Web Title: Respect the leader's words

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.