तेऊरवाडीत कुस्ती मैदानास प्रतिसाद

By admin | Published: March 29, 2015 10:06 PM2015-03-29T22:06:01+5:302015-03-30T00:27:37+5:30

प्रथम क्रमांकाच्या लढतीत आकाश घाडी (यळ्ळूर) याने शिनोळच्या पुंडलिक पैलवानवर अर्ध्या मिनिटात छटी टांग डावावर विजय मिळविला.

Responding to wrestling Madanase in Teurawadi | तेऊरवाडीत कुस्ती मैदानास प्रतिसाद

तेऊरवाडीत कुस्ती मैदानास प्रतिसाद

Next

कोवाड : तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे श्री राम तालीम मंडळातर्फे श्रीराम नवमीनिमित्त आयोजित कुस्ती मैदानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र, कर्नाटकसह राजस्थानच्या मल्लांनी यामध्ये भाग घेतला.माजी सैनिक बॉक्सर सुबराव पाटील यांच्या हस्ते मैदानाचे पूजन झाले. प्रथम क्रमांकाच्या लढतीत आकाश घाडी (यळ्ळूर) याने शिनोळच्या पुंडलिक पैलवानवर अर्ध्या मिनिटात छटी टांग डावावर विजय मिळविला. पवन चिखलीकर व यळ्ळूरच्या नीलेश यांच्यात झालेली द्वितीय क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. तृतीय क्रमांकाच्या लढतीत तुर्केवाडीच्या विठ्ठल मोरेने कोवाडच्या सागर राजगोळकर याच्यावर बगली सवारी डावावर विजय मिळविला. रूपेश धर्मागीने (कोवाड) चतुर्थ क्रमांक मिळविला. याशिवाय महादेव पाटील, प्रकाश पाटील, सौरभ पाटील, रवळनाथ पाटील (तेऊरवाडी), यशपाल (राजस्थान) यांनी यश मिळविले. पंच म्हणून महादेव पाटील, प्रकाश दळवी, राजाराम पाटील, रामू भिंगुडे, मुकुंदा गुडाजी, सुबराव पाटील, पुंडलिक पाटील यांनी काम पाहिले.विजेत्यांना सरपंच एकनाथ पाटील, कल्लाप्पा भोगण, प्रकाश पाटील, कुश पाटील, दत्तात्रय पाटील, आदींच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. एम. ए. पाटील यांनी समालोचन केले. एन. व्ही. पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Responding to wrestling Madanase in Teurawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.