आमशीत अँटिजन तपासणीला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:59+5:302021-06-26T04:17:59+5:30

सांगरुळ : आमशी (या. करवीर) येथे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने अँटिजन टेस्ट घेण्यात आल्या, ...

Response to anthrax antigen testing | आमशीत अँटिजन तपासणीला प्रतिसाद

आमशीत अँटिजन तपासणीला प्रतिसाद

Next

सांगरुळ : आमशी (या. करवीर) येथे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने अँटिजन टेस्ट घेण्यात आल्या, त्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावामध्ये शंभर लोकांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये दोन महिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

शासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच गावांमध्ये अँटिजन टेस्ट घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आमशी गावात या चाचणीस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज गावातील समाज मंदिरामध्ये शंभर लोकांची टेस्ट घेण्यात आली. यामध्ये दोन महिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांना तात्काळ अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. पुरुषांबरोबर महिलाही अँटिजन चाचणी करून घेण्यात अग्रेसर दिसत होत्या.

सरपंच उज्वला पाटील, उपसरपंच नामदेव पाटील, आरोग्य सेविका एस. एस. कुलकर्णी, टेक्निशियन पूजा खोले, आरोग्य सेविका एस. डी. सावंत, ग्रा. पं. सदस्य बाजीराव कांबळे, रेश्मा लोखंडे, रामनाथ पाटील, अमोल लोखंडे, ग्रामसेवक शिवाजी वाडकर आदी उपस्थित होते.

फोटो ओळी - आमशीमध्ये अँटिजन टेस्टला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी ग्रामसेवक शिवाजी वाडकर, रामनाथ पाटील आदी उपस्थित होते.

(फोटो-२५०६२०२१-कोल-आमशी)

Web Title: Response to anthrax antigen testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.