कागल येथे रक्तदान शिबिरात प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:24 AM2021-04-22T04:24:08+5:302021-04-22T04:24:08+5:30

येथील गैबी चौकातील शाहू सभागृहात कोल्हापूर येथील अर्पण ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. माजी ...

Response to blood donation camp at Kagal | कागल येथे रक्तदान शिबिरात प्रतिसाद

कागल येथे रक्तदान शिबिरात प्रतिसाद

Next

येथील गैबी चौकातील शाहू सभागृहात कोल्हापूर येथील अर्पण ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, श्रीनाथ सहकार समूहाचे अध्यक्ष चद्रंकात गवळी, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, मुख्याधिकारी पंडित पाटील सुनील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद‌्घाटन करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष संजय चितारी, माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, अस्लम मुजावर, गंगाराम शेवडे, सौरभ पाटील, विवेक लोटे, सतीश गाडीवड्ड, इरफान मुजावर, गणेश सोनुले, निहाल जमादार, गणेश कांबळे, मुन्ना शहाणेदिवाण, मुश्रीफ फाउंडेशनचे हारुण मुजावर, बाॅबी बालेखान आदी मान्यवर उपस्थित होते. डी.आर. माने महाविद्यालयाच्या छात्रसेना आणि एन.एस.एस. विद्यार्थी यांनी या रक्तदान शिबिरात भाग घेतला. रक्तदान केलेल्यांना प्रमाणपत्र तसेच वाफ घेण्याचे मशीन देण्यात येत होते.

कागलमध्ये आता हसन मुश्रीफ पार्क..

येथील महामार्गालगत असलेल्या साबिया अपार्टमेंटजवळ तयार करण्यात आलेल्या रहिवासी क्षेत्रास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव देण्यात आले असून नामदार हसनसो मुश्रीफ पार्क असे नामकरण असलेली भव्य कमानखाली कन्स्ट्रक्शनकडून उभारली जाणार आहे. या कमानीचा पायाभरणी सोहळा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आला.

२१कागल

फोटो...

कागल येथील शाहू सभागृहात आयोजित रक्तदान शिबिराच्या शुभारंभप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, सतीश गाडीवड्ड आदी उपस्थित होते.

Web Title: Response to blood donation camp at Kagal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.