कागलमध्ये आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:45 AM2021-02-06T04:45:11+5:302021-02-06T04:45:11+5:30

: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त कागल शहरात आयोजित रक्तदान ...

Response to health check-up camp in Kagal | कागलमध्ये आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

कागलमध्ये आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

Next

: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त कागल शहरात आयोजित रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद मिळाला. तसेच प्रवाशांना दूधवाटप आणि रुग्णांना फळे वाटपही केले.

येथील शाहूनगर वाचनालय सभागृहात आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा माणिक माळी यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रक्त पिढीच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. तर धन्वंतरी बायोसायन्सच्या पथकाने रुग्णांची तपासणी केली. कागल बसस्थानकात पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे आणि पश्चिम महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष साताप्पा आणुरकर यांच्या हस्ते प्रवाशांना दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी आर.पी.आय.चे तालुका अध्यक्ष बाबासाहेब कागलकर, कार्याध्यक्ष बी.आर. कांबळे, सचिव सचिन मोहिते, युवा आघाडीचे विनोद कांबळे, अजित भोसले, अण्णासाहेब आवळे, साताप्पा हेगडे, उत्तम साकेकर, पी.एम. कांबळे, तानाजी सोनाळकर, दिनेश मळगेकर, सर्जेराव गलगलेकर, तातोबा कुरणीकर, दिलीप शेंडूरकर, मंजुनाथ वराळे, विद्याधर शिंदे, उदय सांगावकर आदी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन

उत्तम कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त कागल बसस्थानक येथे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या हस्ते दूध वाटप करण्यात आले. यावेळी विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Response to health check-up camp in Kagal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.