दानोळीत कोविड महा लसीकरणाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:25 AM2021-09-27T04:25:54+5:302021-09-27T04:25:54+5:30
दानोळी : दानोळी (ता. शिरोळ) येथे ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या माध्यमातून एक पाऊल कोरोना मुक्तीकडे या उद्देशाने ...
दानोळी : दानोळी (ता. शिरोळ) येथे ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या माध्यमातून एक पाऊल कोरोना मुक्तीकडे या उद्देशाने संपूर्ण गाव शंभर टक्के कोरोना मुक्त व्हावे यासाठी गावात सहा ठिकाणी लसीकरण शिबिर राबवले. यामध्ये १,८६१ नागरिकांनी लस घेतली.
गावातील सहा ठिकाणी लस देण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी १२ डॉक्टर्स, ६ आरोग्य सेविका, ६ आरोग्य सेवक, ४ मदतनीस, २० आशा स्वयंसेविका, १२ गटप्रवर्तक, २५ शिक्षक व जिल्हा परिषद शाळेच्या ३५ शिक्षकांनी या लसीकरणासाठी काम केले. तर, रजिस्ट्रेशन जलद गतीने होण्यासाठी १५ कॉम्प्युटरची सोय करून सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत लसीकरणाची वेळ ठेवण्यात आली होती.
अठरा वर्षावरील व पहिली लस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना दुसरी लस देण्यात आली. या शिबिरामध्ये ज्या नागरिकांनी अजून लस घेतलेली नाही. अशा नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राकडून करण्यात आले होते.