कोल्हापुरात तासभर बत्ती गायब बिंदू चौकातील "अर्थ अवर" उपक्रमाला प्रतिसाद
By संदीप आडनाईक | Published: March 26, 2023 08:19 AM2023-03-26T08:19:22+5:302023-03-26T08:20:01+5:30
ऐतिहासिक बिंदू चौकात तीनशे विद्यार्थ्यांनी दोन हजार पणत्या प्रज्वलित केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: वीजेची बचत, कार्बन उत्सर्जनास प्रतिबंध करण्यासाठी कोल्हापूरात शनिवारी रात्री सुमारे पंचवीस हजार पथदिवे बंद करून पर्यावरणप्रेमींनी अनोख्या पद्धतीने "अर्थ अवर" उपक्रम साजरा केला. कोल्हापुरातील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर महापालिका आणि ‘महावितरण'' हा उपक्रम आयोजित केला होता. ऐतिहासिक बिंदू चौकात तीनशे विद्यार्थ्यांनी दोन हजार पणत्या प्रज्वलित केल्या.
सायंकाळी साडेसात ते रात्री साठे आठ या तासात महापालिकेच्या विद्युत विभागाने शहरातील सर्व पथदिवे बंद केल्याने बती गायब झाली होती. जगभरात २००७ पासून हा उपक्रम सुरू झाला. सध्या १९० देशांत हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमात ६० हुन अधिक विद्यार्थ्यांनी हजारो मेणबत्त्या प्रज्वलित करून अनोखा संदेश दिला.
डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे, डॉ. लितेश मालदे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र रायकर, ‘एनएसएस'' समन्वयक प्रा. योगेश चौगुले, डॉ. राहुल पाटील, तुषार वाळवेकर, डॉ. प्रतीक गायकवाड, विशाल शिंदे,‘एनएसएस''चे विद्यार्थी अमृत नरके, प्रथमेश आरगे, सौरभ केसरकर, ओंकार कोतमीरे, रत्नदीप कांबळे यांनी या उपक्रमात भाग घेतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"