भादोलेत दोन दिवसांच्या ‘जनता कर्फ्यू’ला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:18 AM2021-05-03T04:18:44+5:302021-05-03T04:18:44+5:30
भादोले गावात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पन्नास कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ...
भादोले गावात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पन्नास कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ४० कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत, तर दहा रुग्ण बरे झाले आहेत. गावात वाढता संसर्ग पाहता ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या झालेल्या बैठकीत कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी दोन दिवसांचा जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा जनता कर्फ्यू दि.१ ते २ मे अखेर करण्यात आला होता. रविवारी दुसऱ्या दिवशीही मेडिकल व दूध विक्री दुकाने, दवाखाने ही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले होती.
कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी पुकारलेला हा जनता कर्फ्यू भादोले ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवून प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतली. सर्व रस्ते व चौकामध्ये शुकशुकाट पसरला आहे. अनावश्यक फिरणाऱ्यांची संख्या फारच कमी होती.
दरम्यान, कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने या बंदमुळे कोरोना साखळी तोडण्यास मदत होईल असा विश्वास सरपंच आनंदा कोळी यांनी व्यक्त केला आहे.