कसबा तारळेत विकेंड लॉकडाऊनला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:23 AM2021-04-11T04:23:17+5:302021-04-11T04:23:17+5:30
गुरुवार (दि ९ ) रात्री आठ वाजल्यापासून विकेंडला लॉकडाऊनला सुरूवात झाली. परिणामी शनिवार सकाळपासूनच नागरिकांनी घरात राहणेच पसंत केले. ...
गुरुवार (दि ९ ) रात्री आठ वाजल्यापासून विकेंडला लॉकडाऊनला सुरूवात झाली. परिणामी शनिवार सकाळपासूनच नागरिकांनी घरात राहणेच पसंत केले. राधानगरी कोल्हापूर मार्गांवर ही अत्यावश्यक सेवा वगळता वाहतूक बंदच होती. दूध संकलन, मेडिकल ,दवाखाने आदी अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. बहुतांशी गावात बँका बरोबरच पतसंस्थांचे ही व्यवहार संपूर्ण दिवसासाठी बंद ठेवल्याचे दिसत होते.
दरम्यान शनिवार दुर्गमानवाड येथील जागृत देवस्थान श्री गैबी विठलाई देवीची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द झाल्याने नेहमीच गजबजलेल्या येथील दुर्गमानवाड फाटा चौकात शुकशुकाट होता. परिसरातील गुडाळ, खिंडी व्हरवडे,आणाजे, पिरळ, तारळे खुर्द, कुडूत्री, करंज फेन या गावातही लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार बंद होते.
१० कसबा तारळे लॉकडाऊन
सोबत फोटो ---------------------------------
फोटो कॅप्शन -- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाऊनमुळे नेहमीच गजबजलेल्या दुर्गमानवाड फाटा येथील चौकात असा शुकशुकाट दिसत होता .