कोविड केंद्रांना मनुष्यबळ, औषध, साधनसामुग्रीची जबाबदारी माळींकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:19 AM2021-06-05T04:19:06+5:302021-06-05T04:19:06+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर (सीसीसी) व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डिसीएचसी) साठी आवश्यक मनुष्यबळ, औषधे, वैद्यकीय ...

The responsibility of manpower, medicine, equipment to Kovid centers lies with the gardeners | कोविड केंद्रांना मनुष्यबळ, औषध, साधनसामुग्रीची जबाबदारी माळींकडे

कोविड केंद्रांना मनुष्यबळ, औषध, साधनसामुग्रीची जबाबदारी माळींकडे

Next

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर (सीसीसी) व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डिसीएचसी) साठी आवश्यक मनुष्यबळ, औषधे, वैद्यकीय साधनसामग्री व इतर अनुषंगिक कामकाजाचे व्यवस्थापन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबतचे आदेश काढले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी सर्व कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या वैद्यकीय अधीक्षक व इतर संबंधित सर्व अधिकारी यांच्याशी संपर्कात राहून क्षेत्रीय स्तरावरील मनुष्यबळ व साधन सामग्री व्यवस्थापन व सनियंत्रण करावे. यासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. यू. जी. कुंभार व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई यांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: The responsibility of manpower, medicine, equipment to Kovid centers lies with the gardeners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.