कोल्हापूरच्या अधिष्ठातांवर ‘सिंधुदूर्ग वैद्यकीय’ची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:51 AM2020-12-11T04:51:49+5:302020-12-11T04:51:49+5:30

कोल्हापूर : येथील शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्यावर सिंधुदुर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची ...

Responsibility of 'Sindhudurg Medical' on the authority of Kolhapur | कोल्हापूरच्या अधिष्ठातांवर ‘सिंधुदूर्ग वैद्यकीय’ची जबाबदारी

कोल्हापूरच्या अधिष्ठातांवर ‘सिंधुदूर्ग वैद्यकीय’ची जबाबदारी

Next

कोल्हापूर : येथील शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्यावर सिंधुदुर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे ते कोल्हापुरात कमी आणि सिंधुदुर्गमध्ये जास्त कार्यरत असल्याची वस्तुस्थिती आहे.

कोरोनाच्या काळात एकीकडे अधिष्ठाता पदाचा संगीत खुर्चीचा सुरू झालेला खेळ अजूनही संपला नसल्याचे चित्र आहे. तीन आठवड्यांपूर्वी चंद्रपूरहून डॉ. एस. एस. मोरे यांची कोल्हापूरला अधिष्ठाता म्हणून बदली झाली. मात्र त्यापाठोपाठच त्यांना सिंधुदुर्ग येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. त्यामुळे ते बहुतांश दिवस कोकणातच असतात. ते स्वत: प्रभारी असून त्यांनी आता त्यांच्या पदाचा कार्यभार डॉ. आरती घोरपडे यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे अजूनही या पदाचा संगीत खुर्चाचा खेळ सुरूच आहे.

Web Title: Responsibility of 'Sindhudurg Medical' on the authority of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.