बंद केलेले रिक्षा स्टॉप पुन्हा सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:24 AM2021-03-10T04:24:16+5:302021-03-10T04:24:16+5:30
काेल्हापूर : शहरात रस्ते विकास प्रकल्प (आयआरबीचे रस्ते) सुरु असताना तात्पुरते बंद केलेले रिक्षा स्टॉप पुन्हा आहे त्या ठिकाणी ...
काेल्हापूर : शहरात रस्ते विकास प्रकल्प (आयआरबीचे रस्ते) सुरु असताना तात्पुरते बंद केलेले रिक्षा स्टॉप पुन्हा आहे त्या ठिकाणी स्थापन करुन मिळावेत, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीने मंगळवारी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. दुचाकी, चारचाकीप्रमाणे शहरात रिक्षासाठी ही स्वतंत्र पार्किंगची सोय करण्याची मागणीही करण्यात आली.
पोलीस निरीक्षक गिरी म्हणाल्या, महापालिका, प्रादेशिक परिवहन विभाग, केएमटी, रिक्षा संघटना प्रतिनिधी यांची बैठक घेऊन यावर मार्ग काढू. ‘ई’ चलनचा दंड एकदम न घेता टप्प्याटप्प्याने घेतला जाईल, महाद्वार रोडवरील प्रवासी वाहतुकीवर कारवाई करु,
महासंघाचे चंद्रकांत भोसले म्हणाले, शहरात ५ हजार ५०० रिक्षा परमीट असून केवळ १,३०० ते १,४०० रिक्षा बसतील एवढ्याच स्टॉपला परवानगी आहे. ५५० रिक्षा स्टाॅप मंजूर आहेत. मात्र, तितके स्टॉप नाहीत. आयआरबीच्या रस्त्यावरील बंद केलेल्या स्टॉपच्या ठिकाणी फुटपाथ उभारले आहेत. जेवढे परमीट दिले तेवढे तरी रिक्षांसाठी स्टाॅपची साेय करावी.
राजेंद्र जाधव म्हणाले, ज्या प्रमाणे चारचाकी, दुचाकीची पार्किंग ठिकाणे केली त्याप्रमाणे रिक्षाची ही करावी. शहरातील खासगी वाहतूक बंद करा, एसटीचे शहरातील थांबे बंद करा. यावेळी विजय गायकवाड, अभिषेक देवणे, दिलीप सूर्यवंशी, उदय गायकवाड आदी उपस्थित होते.
चौकट
‘ई’ चलनवरुन खडाजंगी
प्रवाशी खरेदीसाठी रिक्षातून उतरल्यानंतर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाते. तसेच ‘ई’ चलनची सुरु असलेल्या कारवाईवरही रिक्षा व्यावसायिकांनी अक्षेप घेतला. यावर पोलीस निरीक्षक गिरी संतापल्या. त्या म्हणाल्या, प्रवाशांची इतकी काळजी करु नका. ई चलनवरील कारवाई थांबवा म्हणून सांगणे चुकीचे आहे. गर्दीच्या ठिकाणी रिक्षा थांबवू नये. यावर राजेंद्र जाधव यांनी कारवाई थांबवावी अशी मागणी नाही. मात्र, वाहतूक निरीक्षक परस्पर कारवाई करतात. संबंधित रिक्षा व्यावसायिकाला कारवाईची माहिती दिली पाहिजे, असे सांगितले.
फोटो : ०९०३२०२१ कोल वाहनधारक संघटना न्यूज
ओळी : कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीने मंगळवारी शहरातील बंद केलेले स्टॉप पुन्हा सुरु करण्याची मागणी शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्याकडे मागणी केली.