खेबवडे येथे केडीसीसी बँकेची शाखा पूर्ववत सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:24 AM2021-04-02T04:24:47+5:302021-04-02T04:24:47+5:30

शाखा पूर्ववत सुरू करण्याबाबतचे निवेदन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले. मौजे खेबवडे हे करवीर तालुक्यातील दक्षिणेकडील शेवटचे ...

Restart KDCC Bank branch at Khebwade | खेबवडे येथे केडीसीसी बँकेची शाखा पूर्ववत सुरू करा

खेबवडे येथे केडीसीसी बँकेची शाखा पूर्ववत सुरू करा

Next

शाखा पूर्ववत सुरू करण्याबाबतचे निवेदन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले.

मौजे खेबवडे हे करवीर तालुक्यातील दक्षिणेकडील शेवटचे गाव आहे. २००३ मध्ये कै. आनंदराव पाटील चुयेकर यांच्या विशेष प्रयत्नातून व खासदार सदाशिवराव मंडलिक, हसन मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते शाखेचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर २०१२ पासून शाखा आजतागायत बंद आहे.

सध्या गावचे सर्व आर्थिक व्यवहार गावापासून ४ किलोमीटर अंतरावर बाचणी येथील शाखेमध्ये करावे लागतात. या ठिकाणी जाण्यासाठी वेळ व पैसा जास्त लागतो. शासनाने दूध बिले कॅशलेस केल्यामुळे प्रत्येक सभासदाला बाचणी शाखेत जावे लागते. महिला व वयोवृद्धांना याचा जास्त त्रास होत आहे. बाचणी शाखेवर सहा गावांचा व्यवहार असल्यामुळे या शाखेवर कामाचा जादा व्याप आहे. त्यामुळे खेबवडे करांच्या सोयीसाठी बँकेची शाखा पूर्ववत सुरू करण्याची आग्रही मागणी होत आहे. निवेदनावर माजी सरपंच सुभाष चौगले वाडकर, सरपंच प्रदीप चौगुले, उपसरपंच सुयोग चौगले वाडकर, गणपती नाथा पाटील, सचिव जालंदर चौगले, दीपक भाट व विविध संस्था प्रतिनिधींच्या सह्या आहेत.

Web Title: Restart KDCC Bank branch at Khebwade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.