कोल्हापुरात १९ ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:25 AM2021-04-20T04:25:42+5:302021-04-20T04:25:42+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे शहरात रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने आतापर्यंत शहरातील चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत १९ ठिकाणी प्रतिबंधित ...
कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे शहरात रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने आतापर्यंत शहरातील चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत १९ ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) करण्यात आले आहेत. याठिकाणी महापालिकेच्यावतीने बॅरिकेटस लावून ही इमारत अथवा गल्ली सील करण्यात आली आहे.
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे, तसा कोल्हापूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. शहरामध्ये आजअखेर १९ कंटेनमेंट झोन तयार केले आहेत. यामध्ये गांधी मैदान विभागीय कार्यालयअंतर्गत ५ ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार केले आहेत. छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयअंतर्गत ६, राजारामपुरी विभागीय कार्यालयअंतर्गत १, तर छत्रपती ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयअंतर्गत ७ ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार केले आहे.
या सर्व ठिकाणी महापालिकेच्यावतीने बॅरिकेटस लावून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून फलक लावण्यात आले आहेत. या कंटेनमेंट झोनमधील नागरिकांनी बाहेर फिरू नये, महापालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.