शिवाजी विद्यापीठाच्या विविध १९ परीक्षांचे निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:24 AM2021-05-13T04:24:58+5:302021-05-13T04:24:58+5:30
या परीक्षा मंडळाने बुधवारी बी.जे. सत्र दोन, बी.एस्सी. एम.टी.एम. सत्र तीन, एम.कॉम. व्हॅॅल्युऐशन रियल इस्टेट सत्र दोन, झुलॉजी सत्र ...
या परीक्षा मंडळाने बुधवारी बी.जे. सत्र दोन, बी.एस्सी. एम.टी.एम. सत्र तीन, एम.कॉम. व्हॅॅल्युऐशन रियल इस्टेट सत्र दोन, झुलॉजी सत्र दोन, ॲॅनॉलिटीकल केमिस्ट्री सत्र दोन व तीन, बॉटनी सत्र चार, एमआरएस सत्र दोन ते चार, बी.ए. ड्रेस मेकिंग सत्र तीन, बी. आर्किटेक्चर सत्र तीन, पाच आणि सात, फिजिकल केमिस्ट्री आणि ऑरगॅॅनिक केमिस्ट्री सत्र दोन व तीन, ॲॅग्रो केमिकल अँड पेस्ट मॅॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले. विविध चार अभ्यासक्रमांसाठी बुधवारी झालेल्या ऑनलाईन परीक्षेसाठी एकूण ९७४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९२५३ जणांनी परीक्षा दिली. हिवाळी सत्रातील परीक्षांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पर्याय निवडला होता त्यांना परीक्षेसाठी ऑनलाईन पर्याय निवडण्यासाठी शनिवार(दि. १५)पर्यंत मुदत आहे.
संगणकप्रणालीमध्ये गुण भरावेत
ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर होत आहेत. या प्रथम वर्ष प्रथम सत्र आणि द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षांच्या गुणांची नोंद सोमवार (दि. १७)पर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर करावी, असे आवाहन परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी केले.