कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचण्यास पुन्हा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:45 AM2021-02-06T04:45:16+5:302021-02-06T04:45:16+5:30

कोल्हापूर : शासन आदेशाप्रमाणे कोविड लसीकरण मोहिमेच्या दुसरा टप्प्याची सुरुवात शुक्रवारपासून करण्यात आली आहे. यामध्ये फ्रण्टलाइनवर काम करणाऱ्या ...

Resumption of corona preventive vaccination | कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचण्यास पुन्हा प्रारंभ

कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचण्यास पुन्हा प्रारंभ

Next

कोल्हापूर : शासन आदेशाप्रमाणे कोविड लसीकरण मोहिमेच्या दुसरा टप्प्याची सुरुवात शुक्रवारपासून करण्यात आली आहे. यामध्ये फ्रण्टलाइनवर काम करणाऱ्या महापालिकेच्या २८ अधिकारी व कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले.

महापालिकेच्या शनिवार पेठेतील सिद्धार्थनगर प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र येथे सकाळी नऊ वाजता उपायुक्त निखिल मोरे यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. उपायुक्त मोरे यांना प्रथम कोविड लस देण्यात आली. कोविड प्रतिबंधक लस सुरक्षित असून, महापालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेण्याचे आवाहन मोरे यांनी केले.

कोविड-१९ संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्देशानुसार विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून लसीकरण मोहीम चार टप्प्यामध्ये राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय व खासगी आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रण्टलाइन वर्कर, तिसऱ्या टप्प्यामध्ये ५० वर्षांवरील नागरीक व ५० वर्षाखालील अनेकविध आजाराने त्रस्त असलेल्या नागरीकांना लसीकरण करण्यात येणार आहे.

लसीकरण महानगरपालिकेच्या पाच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तसेच सीपीआर, गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज, ॲस्टर आधार व ॲपल सरस्वती हॉस्पिटल या ठिकाणी देण्यात येत आहे. या नऊ केंद्रांमध्ये एकूण ९०० लाभार्थींना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले होते, यापैकी ४२७ लोकांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी २८ महापालिकेचे फ्रण्टलाइन अधिकारी, कर्मचारी आहेत.

लसीकरण दिल्यानंतर संबंधितांना अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. यामध्ये कोणालाही त्रास झाल्याचे आढळून आलेले नाही. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, आरसीएच नोडल ऑफिसर डॉ. अमोलकुमार माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ खैरमोडे, डॉ. अर्पिता खैरमोडे, डॉ. भूपाळे उपस्थित होते.

Web Title: Resumption of corona preventive vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.