जीवनात पुन्हा उभारी घ्या : अमल महाडीक
By admin | Published: May 13, 2017 05:41 PM2017-05-13T17:41:16+5:302017-05-13T17:41:16+5:30
भारत विकास परिषदेतर्फे ५५ गरजुंना जयपूर फुट वाटप
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १३ : भारत विकास परिषदेने दिलेल्या बाह्यांगातून आपण जीवनात पुुन्हा उभारी घ्यावी, असे प्रतिपादन आमदार अमल महाडीक यांनी व्यक्त केले.
भारत विकास परिषदेच्यावतीने विकलांग सहाय्यता योजनेअंतर्गत करवीर नगर वाचन मंदीर येथे शनिवारी दिव्यांगांना जयपूर फुट व पोलिओ कॅलिपर्स प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ५५ गरजुंना जयपूर फुट वाटप करण्यात आले.
आमदार महाडीक म्हणाले, आजच्या आधुनिक काळात जन्मजात बालकांना कोणत्या प्रकारचे आजार आहेत. याबद्दलची चाचणी करणारे स्कॅनिग मशीन वैद्यकीय क्षेत्रात आली आहेत.त्यामुळे जन्मताच मुले दिव्यांग जन्माला येऊ नये याकरीता काळजी घेणे काळाची गरज आहे. काही वेळेला आपल्या हलगर्जीपणामुळे आपल्याला दिव्यांगपणा येतो. यात कोणत्या प्रकारची हलगर्जी जीवावर बेतू शकते. हे आजच्या युवा पिढीलाही समजणे गरजेचे आहे. याकरीता सोशल मिडीयावरुन याबाबत पदोपदी चुकीच्या पद्धतीने वाहने हाकणाऱ्यांना त्यांच्या हलगर्जीपणाची जाणीव करुन द्यावी. आपण कसे वागलो आणि काळजी घेतली असती तर आपण सर्वांसारखेच असतो हेही त्यातून प्रबोधन करणे गरजेचे आहे.
जिल्हा दिव्यांगमुक्त करण्यासाठी सर्वांनीच पुढे येणे गरजेचे आहे. ज्या काही सोयी सुविधा दिव्यांगाना हव्या आहेत. दिव्यांगांना लागणाऱ्या मदतीसाठी आपण सदैव तयार आहे. भारत विकास परिषदेचे काम कौतुकास्पद आहे. अशा प्रकारच्या चांगल्या कामासाठी निधी उभा करण्यासाठी दानशूर व्यक्ती , संस्था, उद्योजक आपण उद्युक्त करु.
स्वागत मनिषा शेणई यांनी ; तर प्रास्ताविक शाखा अध्यक्ष सतीश कुलकर्णी यांनी केले. यावेळी जयंत जेस्ते, श्रीकृष्ण साळोखे, सुर्यकिरण वाघ, नितीन वाडीकर, भाजपा जिल्हा अध्यक्ष संदीप देसाई, आदी उपस्थित होते.