भरपावसात महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 04:00 PM2020-09-22T16:00:35+5:302020-09-22T16:04:46+5:30
मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सुरू असलेल्या विरोधात मंगळवारी महिलांनी भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडक दिली. करो या मरो या भूमिकेत असलेल्या या महिलांनी पाऊस आणि कोरोनाचीही पर्वा केली नाही.
कोल्हापूर : मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सुरू असलेल्या विरोधात मंगळवारी महिलांनी भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडक दिली.
करो या मरो या भूमिकेत असलेल्या या महिलांनी पाऊस आणि कोरोनाचीही पर्वा केली नाही.
छत्रपती शासन महिला आघाडीच्या दिव्या मगदूम यांच्या नेतृत्वाखाली दुपारी हा मोर्चा निघाला. स्टेशन रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा निघालेल्या या मोर्चात महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई याना देऊन त्यांच्याशी चर्चा केली.
- वसुलीचा तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर फोजदारी कारवाई करा
- वसुलीला पूर्ण पणे स्थगिती देऊन कर्जेही कायमची माफ करा
- महिलांना अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा
सोशल डिस्टन्सचा फज्जा
या मोर्चा पाचशेच्या वर महिलांनी सहभाग घेतला, कोरोनामुळे एकत्र येण्यास बंदी असतानाही मोर्चा निघाला, यात तोंडाला तोकडे मास्क वगळता कोणतीही खबरदारी घेतली गेली नव्हती. मोर्चा एकत्र चालताना आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारून बसताना ही सोशल डिस्टन्स त्यांच्या ध्यानी मनीही दिसत नव्हते.पण यातून समूह संसर्ग झाला तर काय अशी भीतीही व्यक्त होत होती, पण त्याची या मोर्चेकरी महिलांना काहीच पर्वा नव्हती.
जिल्हाधिकारी यांनी दिलेले आश्वासन
कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवू, बेकायदेशीर वसुली करणाऱ्यावर कारवाई करू, असे करणाऱ्या कंपन्यांचे लायसन रद्द करण्याची शिफारस करू, वसुलीच्या संदर्भात सक्ती झाल्यास पोलीस अधीक्षक यांना कारवाईच्या सूचना देऊ