बिद्रीत सेवानिवृत्त कामगारांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:18 AM2021-07-01T04:18:08+5:302021-07-01T04:18:08+5:30
बिद्री साखर कारखान्याच्या प्रधान कार्यालयात वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले सुनील पिराले, रामचंद्र पाटील, दतात्रय मुधोळकर यांचा कामगार नेते आर. ...
बिद्री साखर कारखान्याच्या प्रधान कार्यालयात वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले सुनील पिराले, रामचंद्र पाटील, दतात्रय मुधोळकर यांचा कामगार नेते आर. वाय. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, जुन्या काळातील कामगार कष्टाने काम करत आले. ते कठीण परिस्थितीला सामोरे गेले. अलीकडे कारखान्यात मोठे तांत्रिक बदल झाले आहेत. तर संगणकीय कार्यप्रणाली यामुळे थोडा ताण कमी झाला असला तरी कामाचा व्याप वाढला आहे. मात्र बिद्रीत सेवा करणे आणि सेवानिवृत्त होणे हे भाग्याचे आहे. यापुढेही सामाजिक कार्यातून आदर्शवत काम करावे.
सत्काराला उतर देताना पिराले म्हणाले सर्वांचे चांगले सहकार्य मिळाले, त्यामुळेच अनेक विभागांत ३४ वर्षे काम केले. यापुढे कुटुंब, मित्र ,पाहुणे व सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेता येईल यांचा आनंद आहे. मात्र आयुष्यातील सर्वाधिक काळ सहकार्याबरोबर व्यथित केला त्यांना सोडून जाताना दु:ख होत आहे. सेवेच्या कामात ताणतणावात चुकीच्या बोलण्यातून कुणाचे मन दुखावले असेल तर माफ करा, असे ते म्हणाले. कार्यक्रमात अनेक कामगारांनी मनोगतातून भावना व्यक्त केल्या.
यावेळी कामगार प्रतिनिधी भीमराव किल्लेदार, शिवाजी केसरकर, शेती अधिकारी बी. एन. पाटील, अशोक फराकटे, अजित आबिटकर, कामगार संघटना अध्यक्ष संजय मोरबाळे, उपाध्यक्ष व्ही. डी. व्हरकट, शांताराम पाटील, महेश जाधव, उदय पाटील यांच्यासह कामगार उपस्थित होते.
अजित आबिटकर यांनी स्वागत केले. तर भीमराव किल्लेदार यांनी आभार मानले.