‘नगरोत्थान’ला पुन्हा ग्रहण

By admin | Published: April 15, 2015 12:44 AM2015-04-15T00:44:28+5:302015-04-15T00:44:28+5:30

बिले थकल्याने कामे बंद : नगरसेवकांचा आंदोलनाचा इशारा

Retrieve Nagrothathan | ‘नगरोत्थान’ला पुन्हा ग्रहण

‘नगरोत्थान’ला पुन्हा ग्रहण

Next

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या नगरोत्थान योजनेतून शहरातील ३८.५० किलोमीटरचे अंतर्गत रस्ते करण्यासाठीची १०८ कोटी रुपयांची व पावसाळी पाणी नियोजनाची २२ कोटी रुपयांची योजना पैशाअभावी पुन्हा रखडली आहे. ठेकेदारांचे बिलाचे पैसे न दिल्याने गेल्या आठ दिवसांपासून काम बंद आहे. १५ मेपर्यंत ही कामे होणे गरजेचे आहे. कामे त्वरित सुरू न झाल्यास यास जबाबदार अधिकारी व ठेकेदारांना जाब विचारणार असल्याचा इशारा नगरसेवक सचिन चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
नगरोत्थान योजनेसाठी मुंबईतील ‘शांतीनाथ रोडवेज’, ‘रेलकॉन’ व ‘यूव्हीबी’ अशा तीन कंपन्यांनी सरासरी ३० टक्के कामे पूर्ण करून तब्बल २७ कोटी रुपयांची रक्कमही उचलून अर्ध्यातच कामे सोडून पळ काढला. या प्रकल्पाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास पुन्हा वर्षभरासाठी थांबावे लागणार आहे. (प्रतिनिधी)


 

Web Title: Retrieve Nagrothathan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.