पैशाचे पाकीट प्रामाणिकपणे परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:23 AM2021-05-15T04:23:31+5:302021-05-15T04:23:31+5:30

कोल्हापूर : राजारामपुरी ते सायबर चौक या रस्त्यावर सापडलेले पैसे असलेले पाकीट महिला व तरुणाने राजारामपुरी पोलीस ठाण्यात प्रामाणिकपणे ...

Return the wallet honestly | पैशाचे पाकीट प्रामाणिकपणे परत

पैशाचे पाकीट प्रामाणिकपणे परत

Next

कोल्हापूर : राजारामपुरी ते सायबर चौक या रस्त्यावर सापडलेले पैसे असलेले पाकीट महिला व तरुणाने राजारामपुरी पोलीस ठाण्यात प्रामाणिकपणे परत केले. सविता विजय कदम व धीरज कारंडे, अशी त्यांची नावे आहेत. या दोघांच्या प्रामाणिकपणाबद्दल शुक्रवारी राजारामपुरी पोलिसांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. सापडलेले पाकीट मूळ मालकाला परत देण्यात आले.

राजारामपुरी परिसरात राहणाऱ्या सविता कदम व धीरज कारंडे हे गुरुवारी सायंकाळी राजारामपुरी ते सायबर चौक या मार्गावरून चालत जात होते. त्यावेळी पंत मंदिराजवळील एटीएम सेंटरजवळ त्यांना ७ हजार रुपयांची रोकड असलेले पाकीट सापडले. हे पाकीट त्या दोघांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांच्याकडे आणून दिले. त्यांनी ओळख पटवून ते संबंधितांना परत दिले.

फोटो : १४०५२०२१-कोल-राजारामपुरी

ओळी : राजारामपुरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी प्रामाणिकपणे सात हजार रुपयांची रोकड असलेले पाकीट सविता कदम व धीरज कारंडे यांनी मूळ मालकाला परत केले.

Web Title: Return the wallet honestly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.